नागपूर : महापौरांच्या हेल्थपोस्टचा गाशा गुंडाळणार

एनयूएचएमअंतर्गत ५० प्राथमिक आरोग्य केंद्र होणार
नागपूर : महापौरांच्या हेल्थपोस्टचा गाशा गुंडाळणार
नागपूर : महापौरांच्या हेल्थपोस्टचा गाशा गुंडाळणारsakal

नागपूर : महापौर दयाशंकर तिवारी यांच्या घोषणेतील ७५ पैकी केवळ दोन सुरू झाले असून मनपा निवडणुकीपर्यंत यात आणखी अठराची भर पडण्याची शक्यता आहे. अर्थात महापौर तिवारी यांच्या काळात केवळ २० हेल्थपोस्ट मार्गी लागणार आहे. पुढील महापौर त्यांची संकल्पना राबविण्याची शक्यता कमीच असून प्रशासनानेही आता एनयूएचएमअंतर्गत ५० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची तयारी केली आहे.

विशेष म्हणजे जागेअभावी महापौरांच्या हेल्थपोस्टचे रुपांतर प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्याचे प्रस्तावित आहे. यावर सामाजिक संस्थेचे नव्हे तर महापालिकेचे नियंत्रण राहणार आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापौरपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहरात ७५ वंदे मातरम हेल्थ पोस्ट तयार करण्याची घोषणा केली. या हेल्थपोस्टसाठी महापालिकेच्या जागेवर तयार करण्यात येणार असून मनपा पाणी, विजेचीही सोय करून देणार आहे.

नागपूर : महापौरांच्या हेल्थपोस्टचा गाशा गुंडाळणार
बिग बॉस मराठीच्या घरामधून संतोष चौधरी बाहेर!

आतापर्यंत ५५ सामाजिक संस्थांनी प्रतिसाद दिला. पश्चिम नागपुरात दोन हेल्थपोस्ट सुरू झाल्या. त्यामुळे इतर शिल्लक हेल्थपोस्ट सुरू होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. महापौरांचा कार्यकाळ मार्च २०२२ पर्यंत आहे. अर्थात आता त्यांचे केवळ चार महिने शिल्लक आहे. जानेवारीत घोषणा केल्यानंतर पहिल्या हेल्थपोस्टच्या उद्‍घाटनासाठी १० महिन्यांचा कालावधी लागला. त्यामुळे पुढील चार महिन्यांत शिल्लक ७३ हेल्थपोस्ट तयार होण्याबाबत शंका निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून महापालिका निवडणुकीपूर्वी एकूण २० हेल्थपोस्ट सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान प्रशासनाने एनयूएचएमअंतर्गत केंद्राच्या निधीतून शहरात एकूण ५० शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लक्ष्य पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत २८ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. आणखी २२ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी महापालिकेने ५० प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी केंद्र सरकारची मंजुरी घेतली. या आरोग्य केंद्रात मनुष्यबळाची गरज असून त्यासाठी लवकरच केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यालाही मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध करून देण्यासाठी हेल्थपोस्टच्या जागेचा विचार करण्यात आला आहे. अर्थातच हेल्थपोस्ट बंद करून प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे हे हेल्थपोस्ट सामाजिक संस्थांनी चालविण्यास घेतले असल्यास त्यांच्याकडून परत घेण्यात येणार असून तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेला धक्का बसणार आहे.

नावही बदलणार

महापौर दयाशंकर तिवारी यांनी वंदेमातरम हेल्थ पोस्ट असे नामकरण केले होते. परंतु हेल्थपोस्टच्या जागेवर एनयूएचएमअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास वंदेमातरम हे नावही बदलण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले. एनयूएचएम ही केंद्राची योजना असल्याने या प्राथमिक केंद्रांना आरोग्यवर्धिनी उपकेंद्र असे नाव देण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com