Nagpur | वैद्यकीय मेडिकल करणार जळीत रुग्णांचा अभ्यास

वैद्यकीय संशोधन परिषदेचा प्रकल्प : घरांचे होणार सर्वेक्षण
Nagpur Medical Research Council
Nagpur Medical Research Councilsakal

नागपूर : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) देशात दहा वैद्यक संस्थांमध्ये जळीत रुग्णांवर संशोधनात्मक अभ्यास करण्याचा प्रकल्प राहवण्यात येणार आहे. दहा केंद्रांमध्ये मुंबई आणि नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयात (मेडिकल) प्रत्येकी एक केंद्र असणार आहे. उपराजधानीसाठी ही भूषणावह बाब असून नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत हे सर्वेक्षण होणार आहे. झोपडपट्टीसहित विविध वस्त्यांमध्येही सर्वेक्षणावर भर देण्यात येईल.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) आणि राम मनोहर लोहिया हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. देशात पटना, चंदिगड, लखनऊ, भुवनेश्वर, इम्फाल, चेन्नई, श्रीनगर,जयपूरसह मुंबईत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्र्रेंनग अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर तर नागपुरातील मेडिकलमध्ये पीएसएम आणि प्लॅस्टिक सर्जरी विभागातर्फे निवड झालेल्या ३ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

Nagpur Medical Research Council
नागपूर : ग्रंथालय, शिक्षण विभागात ७४ लाखांची बोगस बिले

प्रत्येक संस्थेला निवड झालेल्या जिल्ह्यात तेथील जळीत रुग्णांबाबतची माहिती गोळा करावी लागणार आहे. जळीत रुग्णांवर प्राथमिक उपचाराबाबतच्या माहितीसह रुग्णांचे लोकसंख्येच्या तुलनेत असणारे प्रमाण, सद्या रुग्णांच्या जगण्याचा दर्जा,रुग्णांबाबत सामाजिक भावनांचा अभ्यास या सर्वेक्षणातून केला जाणार आहे. या जळीत रुग्णांवर उपचाराची सोयी सुविधांचा जिल्ह्यातील आढावा घेण्यात येणार आहे. त्याचप्रकारे जळीत रुग्णामध्ये जगण्याविषयी न्यूनगंड आला आहे का? रुग्णांची नागरिकांशी असणारे वर्तीन याची संपूर्ण माहिती गोळा करण्यात येईल.

प्राथमिक उपचाराबाबत होणार जागृती

या प्रकल्पांतर्गत जनसामान्यंमध्ये जळीत रुग्णांवर प्राथमिक उपचारस कसे करायचे यासंदर्भातील जनजागृती करण्यात येणार आहे. यानंतर या जागृतीचा नागरिकांवर परिणाम झाला की, नाही, यासंदर्भात ३ ते ४ महिन्यांनंतर पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात येईल. आहे. मेडिकलमध्ये सामाजिक जनऔषधीशात्र विभागाचे प्रमुख डॉ. उदय नारलावार आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्ददर्शनात हे सर्वेक्षण होणार आहे.

Nagpur Medical Research Council
कुटुंबीय गेले लग्नाला अन्‌ चोरट्यांची बंगल्यावर ‘वरात’

सर्वेक्षणातील घरांची संख्या

  •  जिल्ह्यात एकुण ३,४०० घरे

  •  शहर आणि ग्रामीणमधील १,७००

  •  शहरात १७०० मधून झोपडपट्ट्यातील १ हजार

  •  ३५० अपार्टमेंटमधील फ्लॅटचा समावेश

  •  ग्रामीणमध्ये १ हजार कच्ची तर ७०० पक्की घरे

"मेडिकलमध्ये जळीत रुग्णांचा अभ्यास करण्याचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. देशातील दहा वैद्यकीय संस्थांमध्ये होणाऱ्या उपक्रमात मेडिकलची निवड झाली, ही बाब भुषणावह आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ती यांच्या मार्गदर्शनता जनऔषध विभाग आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या वतीने रुग्णांचा सखोल अभ्यास लवकरच सुरू होईल."

-डॉ. उदय नारलावार, विभागप्रमुख, सामाजिक जनऔषध विभाग, मेडिकल, नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com