Nagpur Metro : वर्धा मार्गावरील ‘डबल डेकर’ गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

संत्रानगरीच्या शिरपेचात खोवला आणखी एक मानाचा तुरा
Nagpur metro Wardha Double decker bridge project
Nagpur metro Wardha Double decker bridge project

नागपूर : अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील वर्धा मार्गावरील डबल डेकर पूलाची प्रतिष्ठेच्या गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्यामुळे संत्रानगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या डबल डेकर पुलाची यापूर्वीच आशिया व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

महामेट्रोच्या वर्धा रोडवरील डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. येत्या सहा डिसेंबरला मेट्रो भवन येथे आयोजित कार्यक्रमात महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांना गिनिज वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. लंडन येथे मुख्यालय असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे कार्यकारी अधिकारी ऋषी नाथ डॉ. दीक्षित यांना प्रमाणपत्र प्रदान करतील.

महामेट्रोने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीसाठी अर्ज केला होता. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या भारतातील प्रतिनिधींनी याबाबत सतत पाठपुरावा केला. त्यांनी आपल्या पथकासोबत अभ्यास केला. त्यानंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने महामेट्रो चा दावा मान्य करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देण्याची घोषणा केली.

या अतिशय मानाच्या आणि विश्वप्रसिद्ध रेकॉर्डसाठी महामेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. नजीकच्या काळात महामेट्रो यासारखे आणखी काही विक्रम कायम करणार आहे यात शंका नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची मान्यता मिळणे हे महामेट्रोच्या कार्याला उत्कृष्टतेची पावती आहे.

-डॉ. ब्रजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com