नागपूर : वीज चोरी करणाऱ्या ४७ जणांवर कारवाई

वीज बिल न भरणाऱ्या ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
Nagpur MSEB Action against 47 people for electricity theft
Nagpur MSEB Action against 47 people for electricity theftsakal

नागपूर : बिनाकी व इतवारी उपविभागात महावितरणने वीज चोरी करणाऱ्यांविरोधात मोहीम राबविली. त्यात ४७ जण वीज चोरी करताना आढळले. त्यांच्यावर करावाई करण्यात आली. वीज बिल न भरणाऱ्या ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला.

इतवारी उपविभागात मोमीनपुरा वितरण केंद्रांतर्गत पोलिस बंदोबस्तात वीज चोरी व वसुली मोहीम राबविण्यात आली. यावेळी २० वीज चोऱ्या पकडण्यात आल्या. त्यांच्यावर कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली. तसेच थकबाकी असणाऱ्या ८ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी एकूण ५ लाख रुपयांच्या वीज बिलांची वसुली करण्यात आली.

बिनाकी उपविभागात वीज चोरी करणाऱ्या २७ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. थकबाकी असणाऱ्या ११ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तसेच मोहिमेत ९ ग्राहकांनी १ लाख २४ हजार रुपयांचा भरणा केला. ही मोहीम अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश तुपकर यांच्या नेतृत्वात अभियंता शशांक डगवार, सतीश होगे, सुबोध मंडपे, होमराज पाटील आदींनी पार पाडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com