नागपूर : तीनशेवर गावांचा वीज पुरवठा खंडित

जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.हद्दीतील पथदिव्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू
Nagpur MSEB street lights Power supply cut 300 villages
Nagpur MSEB street lights Power supply cut 300 villagessakal

नागपूर : ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांची वीजबिले थकल्याने थकबाकीचे ओझे वाढले. त्यामुळे पुन्हा महावितरणने नागपूर जिल्ह्यातील विविध ग्रा.पं.हद्दीतील पथदिव्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. आजवर महावितरणकडून जिल्ह्यातील तीनशेवर गावातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला असून, शासनाच्या गोंधळामुळे गावे अंधारात असल्याचा आरोप सरपंच सेवा महासंघाने केला आहे.

१५ नोव्हेंबर २०२१ च्या ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रा.पं. हद्दीतील रस्त्यावरील दिवाबत्तीची देयके भागविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान जि.प.ला अदा करण्याबाबत निर्देशित केले आहे. त्यानंतरही महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऊर्जामंत्र्यांनी महावितरणला सदर शासन निर्णयानुसार कार्यवाही करून वीज पुरवठा पूर्ववत करण्याच्या सूचना करावा अशी मागणी सरपंच सेवा महासंघाच्या अध्यक्षा प्रांजल वाघ, सरचिटणीस मनीष फुके आदींनी ऊर्जामंत्र्यांसोबतच जिल्हाधिकारी आर. विमला, जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवर पथदिवे व पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलाची महावितरणकडील जवळपास १४७ कोटींवरील थकबाकी आहे. हा अहवाल शासनाला सादर केला आहे. शासनाने ही थकबाकी भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला ३.८१ कोटी ४० हजार ८७० रुपये दिलेत. महावितरणच्या कार्यवाहीबाबतही शासनाला अवगत केले आहे.

- योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

महावितरणकडून पथदिव्यांच्या थकबाकीमुळे नरखेड तालुक्यातील येणीकोणी, जुनोना, सावरगाव, म्हसाळा, मोहगाव आदींसह काटोलमधील पारडशिंगा, चलखलागडे, येनवा आदी गावांसोबतच जिल्ह्याभरातील तीनशेवर ग्रा.पं. हद्दीतील वीज पुरवठा खंडित केला आहे. २९ नोव्हेंबर २०२१ च्या निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींवरील पथदिव्यांच्या थकबाकीचे पैसे महावितरणला द्यावे.

- मनीष फुके, सरचिटणीस, सरपंच सेवा महासंघ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com