नागपूर : प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात आजपासून धडक कारवाई

विक्रेते, वापरकर्त्यांवर करडी नजर
Nagpur muncipal Strict action against banned plastics
Nagpur muncipal Strict action against banned plastics

नागपूर : सध्या शहरात प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात उद्या, १ जुलैपासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी होती. विक्रेते, वापरकर्त्यांवर महापालिकेची करडी नजर राहणार असून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईची तयारी केली आहे. सजावटीसाठीचे प्लॅस्टिक व पॉलिस्टीरिन (थर्माकोल), मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेटची पॉकिटे, प्लॅस्टिकच्या कांड्यासह कानकोरणी, फुग्यांना लावण्यात येणाऱ्या प्लॅस्टिक कांड्या, प्लॅस्टिकचे झेंडे, आइस्क्रीम कांड्या, प्लेट्स, कप, ग्लासेस, काटे, चम्मच, चाकू, स्ट्रॉ, ट्रे १०० मायक्रॉन पेक्षा कमी प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, कचरा व नर्सरीसाठी उपयोगात येणाऱ्या पिशव्या वगळता सर्व कम्पोस्टेबल प्लॅस्टिक, पकड असलेल्या व नसलेल्या सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या, डिश बाउल, कंटेनर आदींना प्रतिबंधित करण्यात आले आहे.

शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठा, आस्थापना, व्यापारी संघटना आदींनी प्रतिबंधित प्लॅस्टिकचा साठा असल्यास त्याबद्दल मनपाला माहिती द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे. उद्यापासून उपद्रव शोध पथकामार्फत बाजारपेठ, दुकाने, आस्थापनांमध्ये तपासणीची धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.

या कारवाईमध्ये प्रतिबंधित प्लॅस्टिक साहित्याचा वापर, वाहते व साठवणूक आढळल्यास महाराष्ट्र विघटनशील कचरा नियंत्रण कायदा २००६ अंतर्गत महाराष्ट्र प्लॅस्टिक व थर्माकोल अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांनी केली अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा

प्रतिबंधित प्लॅस्टिक संदर्भात शहरातील व्यापाऱ्यांनी काल, बुधवारी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची भेट घेउन चर्चा केली. व्यापाऱ्यांनी मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त जोशी यांनी केले. सूचनांचे तंतोतत पालन करून प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी यावेळी व्यापाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com