नागपूर : पावसाळ्यातच मनपा निवडणुकीचे धुमशान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Municipal Corporation elections June end or early July

नागपूर : पावसाळ्यातच मनपा निवडणुकीचे धुमशान!

नागपूर : प्रभाग रचनेचा अंतिम आराखडा प्रसिद्ध झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने विदर्भात पावसाळ्यात निवडणूक घेण्यास हरकत नाही असे निर्देश दिल्याने जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला नागपूर महापालिकेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे इच्छुकही आजपासूनच कामाला लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यातील सर्वच महापालिका आणि निवडणूक होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागाचा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मात्र पावसाळा असल्याने निवडणूक घेणे योग्य होणार नाही असे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. त्यावरून सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र न्यायालयाने मुंबई आणि कोकणमध्येच धो-धो पाऊस कोसळतो, त्यामुळे जनजीवन ठप्प होत असल्याने येथील निवडणुका वगळून इतर ठिकाणी घेण्यास सांगितले आहे.

पावसाळ्यातच मनपा निवडणुकीचे धुमशान!

यात विदर्भ आणि मराठवाड्याचा समावेश आहे. त्यामुळे या दोन विभागातील निवडणूक जाहीर करण्याचा कार्यक्रम मोकळा झाला आहे. त्यामुळे याच महिन्याच्या अखेरीस राज्य निवडणूक आयोगामार्फत महापालिकेच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच झाल्यास जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातील नागपूरमध्ये मतदान घेण्यात येईल.

निवडणुका पुढे ढकलल्या जातील या आशेवर असलेले इच्छुक सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सक्रिय झाले आहे. दिवसभर कुठल्या महिन्यात निवडणूक जाहीर होईल याविषयी जोरदार चर्चा महापालिकेच्या वर्तुळात झडली होती. आयोगामार्फत ज्या पद्धतीने घाई केली जात आहे ती बघता याच महिन्याच्या शेवटी तारीख जाहीर केली जाणार असल्याचा दावाही अनेकांनी केला.

रचनेत एक प्रभागाचा अपवाद वगळता काहीच बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे लढती स्पष्ट झाल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या सीमाही ठावूक झाल्या आहेत. आता फक्त आरक्षण कसे पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी आणि सक्रिय नगरसेवक सध्याच्या रचनेवर खुश आहेत. जवळपास अंशी टक्के वस्त्या प्रभागात असल्याने फारशा तक्रारी नाहीत. त्यामुळे इच्छुक कामाला लागले आहेत.

Web Title: Nagpur Municipal Corporation Elections June End Or Early July

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top