नागपूर : चार फुटांपेक्षा उंच मूर्तींचे तलावात विसर्जन नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur Municipal Corporation rule regarding ganesh idols

नागपूर : चार फुटांपेक्षा उंच मूर्तींचे तलावात विसर्जन नाही

नागपूर : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना यंदा मूर्ती स्थापनेची परवानगी घेतानाच बाप्पाला कुठे विसर्जित करणार याची लेखी माहिती द्यावी लागणार आहे. महापालिकेने सार्वजनिक तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला परवानगी नाकारली असून चार फुटांची मूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बुधवारी घेतला. बैठकीला सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध हटविले आहेत. तरी नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती दोन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात याची काळजी घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाद्वारे मोठ्या उंचीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. मात्र, त्यांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दृष्टीने कमी उंचीच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यासाठी पुढाकार घ्यावा. चार फूट किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जनस्थळीच विसर्जित करण्याची अटही टाकण्यात आली आहे.

सर्व तलाव विसर्जनासाठी बंद

गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही शहरातील सर्व तलाव मूर्ती विसर्जनासाठी बंद करण्यात आलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने मूर्ती विसर्जनासाठी यंदाही कृत्रिम हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे शहरातील विहिरी आणि तलावात होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसणार आहे.

आयुक्तांचे आदेश

  • प्रत्येक झोनमध्ये गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी विशेष कक्ष सुरू करा.

  • मंडळाने स्थापन केलेल्या मूर्तीची उंची मोजावी.

  • चार फुटापेक्षा जास्त मूर्ती असल्यास त्यांच्याकडून विसर्जन स्थळाची लेखी माहिती घ्या.

  • सर्व मंडळांना नियमांची व्यवस्थित माहिती द्या.

  • सर्व तलावांचे बॅरिकेटिंग करा

Web Title: Nagpur Municipal Corporation No Permission To Immerse Ganesh Idols In Public Pond

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..