अरेच्या ! येथे महापालिकाच फेकते कचरा ?

नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्‍न निर्माण झाला आहे.
Nagpur
Nagpur Sakal

नागपूर : शहरातील (City) कचरा उचलण्यासाठी महापालिकेने9MU खासगी संस्थेला कंत्राट दिले आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्या जातात. मात्र, शहरातील हिवरीनगर पाॅवर हाउस परिसरातील नागपूर (Nagpur) सुधार प्रन्यासच्या भूखंडावर खुद्द महापालिकेकडूनच कचरा आणून टाकल्या जातो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हिवरीनगर पाॅवर हाऊसजवळ एनआयटीचा रिकामा भूखंड आहे. या भूखंडावर अगोदर परिसरातील नागरिक कचरा टाकायचे. मात्र, परिसरातील काहींनी त्यावर आक्षेप घेत, तो कचरा टाकणे बंद केले. मात्र, गेल्या काही महिन्यापासून परिसरातील गोळा झालेला कचरा, महापालिकेद्वारे नेमलेल्या कंत्राटदार या ठिकाणी आणून टाकतात. त्यामुळे या ठिकाणी डास, दुर्गंधी निर्माण होते. त्यावर डुकरे ताव मारत असून परिसरात साप निघतात. याबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. यामुळे नागरिक हैराण झाले आहे. शहरात कचरा असलेल्या काही ठिकाणी आग लागल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या कचऱ्याला आग लागल्यास परिसरातील घरांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे.

Nagpur
गोळीबाराने जळगाव पून्हा हादरले..कांचननगर परिसरात घडली घटना

भंगार दुकानामुळे नागरिक त्रस्त

हिवरीनगर पावर हाऊस परिसरात असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासच्या बागेजवळ भंगाराचे दुकान आहे. या दुकानात अनेकदा चोर आणि दारुडे येतात. ते परिसरात शिवीगाळ करतात. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. विशेष म्हणजे, त्यामुळे परिसरातही चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. पोलिसांकडे तक्रारी देऊनही काहीच कारवाई केली नाही.

परिसरातील रिकाम्या भूखंडावर कचरा

टाकून महापालिकेचे कर्मचारी निघून जातात. कचऱ्यामुळे येथे डुकरे आणि गायी येतात. शिवाय दुर्गंधी पसरल्याने डासांचा त्रास वाढला आहे.

Nagpur
'आमच्या कामात अडथळा आणू नका', बायडेन यांचा तालिबानला इशारा

- मंजूषा चकोले, नागरिक

आमच्या घराला लागून अगदी भंगाराचे दुकान आहे. दिवसभर होणाऱ्या आवाजाने आमचे जगणे मुश्कील झाले आहे. शिवाय येथे येणारे लोक दारू पिऊन असतात. ते शिवीगाळ करतात. त्यामुळे आम्हाला त्याचा बराच त्रास होतो आहे.

- मीनाक्षी चौधरी, नागरिक

परिसर रहिवासी असल्याने या ठिकाणी भंगारासारख्या दुकानामुळे वातावरण खराब होत आहेत. गुंड प्रवृत्तीचे लोकांचे येणे-जाणे सुरू झाल्याने नागरिकांना नाहक त्रास वाढला आहे.

- प्रवीण लोणारे, नागरिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com