Nagpur News : सात हजार खड्डे बुजवूनही हादरे कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

Nagpur News: सात हजार खड्डे बुजवूनही हादरे कायम

नागपूर : महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाद्वारे तसेच जेट पॅचरने गेल्या नऊ महिन्यांत सात हजार खड्डे बुजविले. परंतु खड्डे पुन्हा तयार होत असल्याने महापालिकेच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खड्ड्यांवर दरवर्षी होणारा कोट्यवधींचा खर्च म्हणजे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्त्यांवरील खड्डे अन् ते चुकवित वाहन चालविणे आता नागपूरकरांच्या अंगवळणी पडले आहे. यातूनच अनेकदा अपघातही होतात. आता जी-२० या आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त येणाऱ्या पाहुण्यांसाठी २२ रस्त्यांचे सौंदर्यीकरण सुरू आहे.

काही रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात येत आहे. मागील एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांत महापालिकेने दहाही झोनमधील ६ हजार ८५४ खड्डे बुजविले. यातील ४ हजार ८२१ खड्डे महापालिकेच्या हॉटमिक्स विभागाने बुजवले त १ हजार ३६५ खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात

सात हजार खड्डे बुजवूनही हादरे कायम

आल्याची आकडेवारी महापालिकेने दिली. परंतु हे खड्डे बुजविल्यानंतरही शहरातील रस्‍त्यांवरील खड्डे कायम आहे.

अनेक खड्ड्यातील गिट्टी निघाली असून नागरिकांना ते वाचवून पुढे जावे लागत आहे. महाराजबाग रस्त्यावरील खड्ड्यांनी महापालिकेच्या कामाचे पितळ उघडे पाडले. याशिवाय ओंकारनगर रोड ते बेलतरोडी रोडवरील काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर खड्डे पडले आहे.

शताब्दी चौक ते बेलतरोडी रोडवरील खड्ड्यांनीही कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खड्ड्यांसाठी डांबर, गिट्टीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु हा खर्च म्हणजे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांसाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरली असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे खड्डे बुजविण्याची केवळ औपचारिकता पूर्ण केली जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या खड्डे बुजविण्याच्या कामामुळे नागरिकांना वर्षभर मनस्ताप सहन करावा लागत आहे.

हॉटमिक्स विभागाने बुजविलेले झोननिहाय खड्डे

झोन बुजवलेले खड्डे एकूण क्षेत्रफळ (चौरस मीटर)

लक्ष्मीनगर २८३ ७१९७.१८

धरमपेठ ४४८ ९५७१.८०

हनुमाननगर ३०६ ३२८४.७५

धंतोली ५४६ ८४२३.५५

नेहरूनगर ५११ ६९१४.५८

गांधीबाग ३३४ ४७६९.८६

सतरंजीपुरा ९६ १४२०.६९

लकडगंज ८३५ ११५५२.७४

आशीनगर ३०९ ५४६६.७३

मंगळवारी ११५३ २०१३१.७३

सर्वाधिक खड्डे मंगळवारी झोनमध्ये

महापालिकेच्या आकडेवारीनुसार हॉटमिक्स विभागाने मंगळवारी झोनमध्ये सर्वाधिक १ हजार १५३ खड्डे बुजविले. पश्चिम व उत्तर नागपूरचा मोठा भाग या झोनमध्ये आहे. पूर्व नागपुरातील लकडगंज झोनमध्ये प्रत्येक रस्त्यांवर खड्डे आहे. महापालिकेने नऊ महिन्यांत या झोनमधील ८३५ खड्डे बुजविले.