नागपूर : प्रभागाच्या अंतिम रचनेबाबत उत्सुकता पोहचली शिगेला

आज होणार जाहीर : माजी नगरसेवक, इच्छुकांत धाकधूक
Nagpur Municipal elections 156 councillors 53 wards will be announced
Nagpur Municipal elections 156 councillors 53 wards will be announcedsakal

नागपूर : प्रभागाच्या अंतिम रचनेबाबत इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. माजी नगरसेवक, इच्छुकांत प्रभागाच्या सीमेवरून अजूनही धाकधूक कायम दिसून येत आहे. उद्या, प्रभागाची अंतिम रचना महापालिकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या आवारात जाहीर करण्यात येणार आहे. प्रभागासोबतच लोकसंख्येनुसार अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षणही जवळपास स्पष्ट होणार आहे.

महापालिक निवडणूक तीन सदस्यीय प्रभागानुसार होणार आहे. नागपुरात एकूण ५२ प्रभाग असून यातून १५६ नगरसेवक निवडून येतील. या ५३ प्रभागाची अंतिम रचना उद्या, १७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महापालिकेकडून आवारात प्रभागाचे नकाशे लावण्याची तयारी पूर्ण झाली आहे. परंतु, विविध राजकीय पक्षातील इच्छुक तसेच माजी नगरसेवकांची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. प्रभाग रचनेवरच अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येकाचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रभागाची रचना अनुकूल निघावी, यासाठी अनेकजण अक्षरशः देवाकडे साकडे घालत आहे.

अनेकांनी प्रभाग रचनेवर हरकती, सूचना दिल्या होत्या. परंतु त्यातील एक किंवा दोनच मान्य झाल्या. त्यामुळे पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजपमधील माजी नगरसेवक तसेच इच्छुक एकमेकांना विचारणा करताना दिसून येत आहे. प्रभाग रचनेबाबत प्रत्येकजण उत्सुक असल्याने उद्या सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांची, माजी नगरसेवकांची महापालिकेत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

प्रभागाची अंतिम रचना जाहीर होतानाच अनुसूचित जाती, जमातीचे आरक्षणही स्पष्ट होणार आहे. महापालिकेने प्रभाग रचना तयार करताना प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या स्पष्ट केली आहे. त्यामुळे ज्या प्रभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त, तो प्रभाग त्यांच्यासाठी राखीव करण्यात येईल. अशीच स्थिती अनुसूचित जमातीबाबतही आहे. विशेष म्हणजे ही निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होत आहे. त्यामुळे सर्वसाधारण जागचे आरक्षण किती राहील, यावरही चर्चा होताना दिसत आहे.

महिला आरक्षणाचे ‘टेंशन’

उद्या, प्रभागाची अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर चार ते पाच दिवसांनी महिला आरक्षण जाहीर केले जाईल. महिलांचे ५० टक्के आरक्षण आहे. त्यामुळे ७८ जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. परंतु यात अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांसाठी कुठल्या प्रभागात जागा आरक्षित राहील, यावरून अनेक इच्छुक पुरुषांचे टेंशन वाढले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com