नागपूर : वडिलानेच केला दहा वर्षीय मुलाचा खून

पट्ट्याने आवळला गळा : बाजारात गेल्याचा केला बनाव
Nagpur murder case drunk Father kill 10 year old boy
Nagpur murder case drunk Father kill 10 year old boysakal

नागपूर : दारुड्या बापाने दहा वर्षीय मुलाचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याची ह्रदयद्रावक घटना कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरादेवी परिसरात रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संतलाल मडावी असे नराधम बापाचे नाव आहे. काल रात्री ते घरी परतल्यावर आठ वाजताच्या सुमारास गुलशन उर्फ गबरु मडावी हा बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आला होता. याची माहिती कोराडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी मुलगा खाली पडला होता आणि त्याच्या गळ्यावर खून दिसून येत होती. त्यामुळे त्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात नोंदवून अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.

गुलशन हा पाचव्या वर्गगात शिकत होता. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, त्यांना संशयास्पद हालचाली दिसून आल्यात. यावेळी आजूबाजूच्यांनाही विचारणा केली असता, त्यांनी गुलशनला त्याचे वडील सातत्याने मारहान करीत असल्याचे सांगितले. त्यातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत विचारणा केली. त्यातून त्याने गुन्ह्याची कबूली देत, मुलाचा पट्ट्याने गळा आवळून खून केल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी आई अनिता सुखमन मडावी (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संतलाल विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बाजारात जाण्याचा केला बनाव

रविवारी कोराडी परिसरात बाजार भरतो. तिथे संतलालचा लहान भाऊ आणि वहिनी दुकान लावते. त्यामुळे गुलशनचे वडील संतलाल आणि त्याची मुलगी आशा (वय १२) हे दोघेही बाजारात गेले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने गुलशनचा गळा आवळून खून केल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे तो दारुच्या नशेत तो गुलशनला नेहमी बेदम मारहान करायचा आणि घरीही भांडण करायचा. यातूनच त्याने हे कृत्य केल्याचे परिसरत बोलल्या जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com