Nagpur : भाजपने ओतले भाकरीवर तूप! भाजप प्रदेशाध्यक्ष. बावनकुळे Nagpur NCP Sharad Pawar told NCP leaders bread turned in the BJP Chandrasekhar Bawankule Two | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar Chandrasekhar Bawankule

Nagpur: राष्ट्रवादीनंतर भाजपमध्ये भाकरी फिरवली! कार्यकारिणीत नागपूरातील दोघांना स्थान

नागपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याची जंबो कार्यकारिणी जाहीर करताना भाकरी फिरवण्याऐवजी तब्बल १२०० जणांचा त्यात समावेश करून भाकरीवर तूप ओतल्याचे दिसून येते.

नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून नागपूर शहरातून दोघांना स्थान देण्यात आले आहे. प्रा. संजय भेंडे पूर्वीच्या कार्यकारिणीतसुद्धा उपाध्यक्ष होते. आता त्यात पदोन्नती देऊन धर्मपाल मेश्राम यांचा समावेश करण्यात आला आहे. मेश्राम भाजपचे प्रवक्तेसुद्धा आहेत. नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारर्कीदीस सुरुवात झाली होती. ते आता प्रदेशचे उपाध्यक्ष झाले आहेत. विशेष म्हणजे दोन उपाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे नागपूर जिल्ह्याचे आहेत. पश्चिम विदर्भातून चैनसुख संचेती यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे तर

भाजपने ओतले भाकरीवर तूप

विदर्भाचे संघटन सचिव उपेंद्र कोठेकर यांना कायम ठेवण्यात आले आहे.

आगामी निवडणुकांची तयारी कार्यकारिणी समावेश करण्यात आलेल्यांची नावे बघता भाजपने आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. एकूण १२०० जणांचा कार्यकारिणीत समावेश करून सर्वांना खुश करण्यात आल्याचे दिसते.

ही जंबो कार्यकारिणी आगामी निवडणुकांची तयारी असल्याचे बोलले जाते. याशिवाय सर्व २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एकूण २८८ संघटकाची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निमंत्रित सदस्य असून माजी आमदार अनिल सोले, माजी महापौर नंदा जिचकार आणि काटोलचे चरणसिंग ठाकूर यांना सदस्य म्हणून कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहेत.

सत्तर टक्के जुनी कार्यकारिणी कायम

भाजपच्या कार्यकारिणी दर तीन वर्षानंतर फेरबदल केले जातात. यावेळी सुमारे साडेतीन वर्षे उलटून गेले होते. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नऊ महिन्यानंतर कार्यकारिणी बदलण्यात आली आहे. भाजपने सत्तर टक्के जुनी कार्यकारिणी कायम ठेवली आहे.