Nagpur : ‘चायना’ नव्हे’ स्वदेशी’ कंदीलच हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur akash diva news

Nagpur : ‘चायना’ नव्हे’ स्वदेशी’ कंदीलच हवा

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आता प्रकाशाच्या उत्सवाला लखलखीत दिव्यांच्या साथीत न्हाऊन टाकण्यासाठी बाजारपेठेत विविध रंगांतील आणि आकारांच्या आकाशकंदीलांची रेलचेल झाली आहे. मात्र, बहुतेक नागरिकांनी ‘चायना’मेड कंदिलांकडे पाठ फिरविली आहे. अस्सल स्वदेशी पद्धतीचे व बनावटीचे आकाश कंदील घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे चायना मेड कंदील हद्दपार झाले असून भारतीय कंदीलांनी बाजारपेठ सजली आहे. यंदा कच्चा मालाच्या दरात वाढ झाल्याने कंदिलांचे भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढलेले आहेत.

हेही वाचा: Nagpur : वैनगंगा नदीत स्कार्पिओ वाहन कोसळले

भारत-चीन तणावानंतर ‘स्वदेशी वापरा’चा नारा घुमू लागल्याचा हा परिणाम झालेला दिसतो. दिवाळीमध्ये घरावर आकाश कंदील लावल्याशिवाय दिवाळसण झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे झोपडीपासून महालापर्यंत सर्वत्र दिवाळी येताच आकाश कंदील प्रकाशमान होतात. पूर्वी कळकांच्या काड्यांना आकारात दोऱ्याने बांधून त्यास चिरमुरी कागद चिटकवून घरीच आकाश कंदील बनवले जात. त्यानंतर आकाशकंदिलांवर ‘चायना मेड’ ची छाप असायची. पारदर्शक अन्‌ चकचकीत कागद आकर्षक आकार असलेल्या कंदिलांनी भारतीय बाजारपेठ काबिज केली होती. मात्र, गेल्या वर्षीपासून नागरिकांनी या चायना बनावटीच्या कंदिलांकडे पाठ फिरवली आहे. यावर्षी तर ग्राहक आवर्जून देशी कंदील आहेत का, अशी विचारणा करत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. त्यामुळेच पारंपरिक भारतीय पद्धतीचे आकाश कंदील विक्रेत्यांकडे प्राधान्याने आढळत आहेत.

हेही वाचा: Nagpur : वाईट मार्ग सोडा, शिक्षणाकडे वळा ; सत्यपाल महाराज

येथील कलाकारांनीही त्यासाठी चांगल्या चकचकीत कागदांचे नियोजन करून त्यामध्ये आकर्षकता आणली आहे. तर चायनापद्धतीचे कंदील विक्रीसाठी आणले आहेत. आता बाजारपेठेत आकर्षक कंदील खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत. जास्तीत जास्त आकर्षक कंदील खरेदीकडे कल वाढला आहे. गोल, बलून, पॅगोडा, हंडी अशा विविध आकाराचे कंदील बाजारात उपलब्ध झाले आहेत.

हेही वाचा: Nagpur Railway station : कुत्रे आणि प्रवासी एकाच प्रतीक्षालयात

साधारणपणे ५० ते १५०० रुपयांपर्यंत किंमत

डेरेदार हंडी, चमचमणारी चांदणी, तबकडी, जम्बो, कोरोना, बलून अशा विविध आकाराचे आणि रंगांचे आकाश कंदील तसेच पणतीच्या आकाराचे कंदीलही बाजारात उपलब्ध आहेत. त्याच्या किमती साधारणपणे ५० ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. मात्र, आजही दोऱ्याचे जाळीदार कंदील, कापडी कंदीलही विविध आकारांत दाखल होऊ लागले आहेत.Nagpur

हेही वाचा: Nagpur : दिवाळीत एसटीच्या १९५ अतिरिक्त बस

मल्टीकलर, जम्बो चायनीज ॲंकर, राजवाडी हे यंदा नवीन आकाश कंदील बाजारात आले आहे. ते आकाश कंदील ग्राहकांच्या पसंतीत पडले असून त्याची टंचाई जाणवू लागली आहे. भारतीय आकाश कंदिलाने संपूर्ण बाजारपेठ काबिज केली असून चायना मेड कंदील पूर्णपणे हद्दपार झाले आहेत.

- शशांक जैन, ठोक आकाश कंदील विक्रेते