nagpur
nagpursakal

Nagpur News : बुकी अनंतच्या अटकपूर्व जामिनावरील निकाल राखून

उच्च न्यायालयात सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण

नागपूर - व्यावसायिक विक्रांत अग्रवाल यांची ऑनलाइन गेमिंगद्वारे कोट्यवधींची फसवणूक करणारा बुकी अनंत उर्फ ​​सोंटू जैन (रा. गोंदिया) याच्या जामिन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज युक्तिवाद करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने निकाल २६ सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

न्यायमूर्ती महेंद्र चांदवानी यांच्या समक्ष या प्रकरणी सुनावणी झाली. कोट्यवधींच्या फसवणुकीचे बळी ठरलेले अग्रवाल यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अनंतच्या गोंदियातील राहत्या घरी छापा टाकला. पोलिसांनी दीड दिवस त्याच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी १७ कोटी रुपये रोख, १२.५ किलो सोने आणि ३०० किलो चांदी असा एकूण २७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अटक टाळण्यासाठी अनंतने जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. त्यामुळे अनंतने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. गेल्या सुनावणीत न्यायालयाने अनंतला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करून पोलिसांना नोटीस बजावून त्याचा जबाब मागवला होता.

nagpur
Nagpur : माता मृत्यूचा दर वाढला आरोग्य व्यवस्थेचा उडाला बोजवारा,नागपुरात दोन दिवसांत तीन उपजत मृत्यू

आज या प्रकरणावरील सर्व पक्षकारांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.तक्रारदार अग्रवाल यांचे वकील श्रीरंग भांडारकर यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, बुकी अनंतने अग्रवाल यांच्याकडून पैसे घेतले आणि पैसे गमावले.

त्यामुळे, हे फसवणुकीचे प्रकरण आहे. अनंत हा ऑनलाइन गेमिंगमध्ये सेवा देणारा आहे. हा गेम दुबई व लंडन येथून चालविला जातो. याची एक मोठी साखळी असण्याची शक्यता आहे. यामुळे अनंतला अटकपूर्व जामीन मिळू नये, अशी विनंती भांडारकर यांनी केली.

nagpur
Ahmednagar : कौटुंबिक वादातून सावळीविहीरमध्ये तिहेरी हत्याकांड

अग्रवाल त्याला दिलेल्या पैशांपैकी ३१ कोटी ८७ लाख २३ हजार ३०० रुपये रोख रक्कमेच्या स्वरूपात दिले होते. यातील २० कोटी ६२ लाख २५ हजार रुपये हे एका स्थानिक जि. प. होते. ते नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सदस्य आहेत. या सदस्याने पैसे अग्रवाल यांना दिले होते, असे तपासात समोर आले असल्याचे चौहान यांनी सांगितले. अशात अग्रवाल तसेच जि. प. सदस्य यांच्याकडे हा पैसा नेमका कुठून आणा?

त्याचे स्रोत काय? याचा तपास करण्याची कसलीही तसदी पोलिसांनी घेतलेली नाही. याउलट अनंतचे थेट दाऊद कनेक्शन असल्याची वक्तव्ये पोलिसांकडून करण्यात आलीत. या प्रकरणी अनंतवर फार तर फार फसवणुकीचा गुन्हा दाखल होत असला तरीसुद्धा त्याला अटकपूर्व जामीन मिळण्यास हरकत नसावी, असा युक्तिवाद ॲड. चौहान यांनी केला.

nagpur
Chh. Sambhaji Nagar : शहरावर आता ड्रोनची नजर

जि. प. सदस्याचेही वीस कोटी

अनंतच्या वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

ऑनलाइन जुगाराद्वारे व्यापारी विक्रांत अग्रवाल यांना गंडा घालणाऱ्या अनंत ऊर्फ सोंटू नवरतन जैनने (रा. गोंदिया) अनेकांना चुना लावल्याचे समोर असल्याचे दावे पोलिसांकडून होत आहेत. मात्र, एका स्थानिक काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याचाही पैसा (रोख) अनंतच्या या ऑनलाइन गेममध्ये लागलेला असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. अनंतचे वकील देवेंद्र चौहान यांनी आज न्यायालयात ही माहिती दिली.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com