अंतर्गत बदलल्यानंतरही कर्मचाऱ्यांना खुर्चीचा मोह आवरेना; मेयोतील प्रकार

Nagpur
Nagpur

नागपूरः इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहण्याचा विक्रम करतात. नुकतेच मेयो रुग्णालयातील अंतर्गत बदल्यांसंदर्भात फतवा धडकला. येथील अनेक विभागातील कर्मचारी ‘खुर्ची’ सोडायला तयार नाहीत. विशेष म्हणजे जुगाड करून पुन्हा त्याच खुर्चीत बसण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Nagpur
Crime : चोरट्यांनी काढला ठाण्यातून पळ? पोलिसांकडून सूचनापत्र दिल्याचे स्पष्टीकरण

मेयोत स्टोअरमधील एकाच खुर्चीत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी काम करीत आहेत. वारंवार बदलीसंदर्भात पत्र निघाले, परंतु ते जागचे हलत नाही. नुकतेच काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा येथील कर्मचाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या. प्रशासनाने रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हलवले.

Nagpur
'तो' क्षण पुन्हा आला! 70 वर्षांची वधु अन् ७२ वर्षांचा वर; धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा

त्यांच्या जागेवर दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला रुजू होण्याचे आदेश दिले. परंतु प्रशासनाच्या आदेशाचा कोणताही परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला नाही. ते खुर्ची सोडायला तयार नाहीत. इमानेइतबारे काम करणारे कर्मचारी मात्र आपल्या पदाचा कार्यभार देऊन मोकळे झाले. नवीन जागेवर रुजू झाले. मात्र काही कर्मचारी आपली अंतर्गत बदली रद्द करण्यासाठी अधिकाऱ्यांपर्यंत पोचले आहेत. अधिकाऱ्यांनीही यांना आश्वासन दिले असल्याची जोरदार चर्चा मेयोत रंगली आहे.

लाइट काम हवे..

बाह्यरुग्ण विभागासह, काही विभागात प्रचंड काम असते. कामाचा अतिरिक्त बोजा असलेल्या ठिकाणाहून मुक्ती मिळावी यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. लाइट काम मिळावे हे साऱ्यांनाच वाटते. मात्र रुग्णालयातील काही विभाग अर्थकारणाशी जुळले असतात. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना खुर्चीचा मोह सुटत नाही. त्याच विभागात काम करण्याची त्यांची इच्छा असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com