
Nagpur : NMRDA क्षेत्रात १३०० कोटींची कामे; अर्थसंकल्पाला मुख्यमंत्र्यांची मंजुरी
नागपूर : शहराच्या सभोवताल ५० किमी परिसरात पसरलेल्या एनएमआरडीए क्षेत्रात २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार ३०० कोटींची विकासकामे केली जाणार आहे. एनएमआरडीएच्या नव्या वित्त वर्षाच्या १ हजार ४८० कोटींच्या अर्थसंकल्पाला शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मान्यता दिली.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधीकरणासंदर्भात (एनएमआरडीए) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेत मुंबईत बैठक पार पडली. बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार,
एनएमआरडीए क्षेत्रात १३०० कोटींची कामे
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एनएमआरडीएचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे अर्थसंकल्प सादर केला.
अशी होणार कामे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक हजार ४८० कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता देतानाच शहराच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. या अर्थसंकल्पात विविध प्रकल्पांसाठी १ हजार २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय रस्ते, पूल आदीसाठी २०० कोटी,
अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे पसरविण्यासाठी ५० कोटी, संरक्षक भिंतीसाठी दहा कोटी, एनएटीपीअंतर्गत विकासकामांसाठी ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १० कोटी रुपये तसेच वृद्धाश्रम व फायर स्टेशनसाठी पाच कोटी रुपयांच्या कामाचा या अर्थसंकल्पात समावेश आहे
एनएमआरडीएच्या अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
महालक्ष्मी कोराडी देवस्थान तीर्थक्षेत्र विकासाचा टप्पा तीन व चारसाठी १०० कोटी
दीक्षाभूमी विकासासाठी ४९ कोटी
स्वदेश तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत २५ कोटी
अमृत योजना दोनसाठी ५० कोटी
फुटाळा तलावासाठी ४३ कोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्वेंशन सेंटरसाठी १५