नागपूर : आता विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी मिळणार

‘बॅचलर ऑफ इंजिनिअरींग’च्या नावात बदल
Nagpur
NagpurSakal

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (Nagpur) विद्यापीठातून (University) आता अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता बॅचलर ऑफ इंजिनिअरींग (बी. ई.) (BE) ऐवजी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक.) (B.Tech) ही पदवी प्रदान करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. २०२३-२४ या सत्राच्या अखेरीस अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण करणारा विद्यार्थ्याला बी.टेक. (B.Tech) पदवी मिळेल.

आयआयटी आणि एनआयटीमधील विविध संस्थांमधून अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बी.टेक. पदवी दिली जाते. मात्र, नागपूर विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ इंजिनिअरींग (बी. ई.) पदवी देण्यात येते. विद्यापीठाने २०२०-२१ या सत्रापासून अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप ‘अ‍ॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग’ असे केले आहे. त्यामुळे पदवीचे नामांतर करण्याची मागणीदेखील समोर येत होती. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत परिषदेसमोर मांडण्यात आला होता.

३१ ऑगस्ट २०२१ रोजी विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीत बी.ई. चे नामांतर बी.टेक. करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने विद्यापीठाने अधिसूचना काढली आहे. २०२०-२१ किंवा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, संचालित महाविद्यालय, स्वायत्त महाविद्यालयांत बी.ई. प्रथम वर्षात प्रवेश घेतला असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.टेक. पदवी प्रदान करण्यात येईल.

Nagpur
स्थलांतर केल्यानंतर शस्त्रक्रियांचा टाका घट्ट

पदवी प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत पर्यत मुदतवाढ

नागपूरः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वीची मुदत विद्यार्थ्यांना ११ ऑगस्टपर्यंत होती. मात्र, विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ न शकल्याने ३० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यलानंतर, ३ सप्टेंबरपर्यंत आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आली. या वाढीव मुदतीतही सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ न शकल्याने या प्रक्रियेला ३० सप्टेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे, अशा सूचना नागपूर विद्यापीठाने दिल्या आहेत. प्राचार्य फोरमने ही मुदतवाढ देण्याबाबत नुकतीच कुलगुरूंकडे केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com