नागपूर : आवक वाढल्याने कांदा झाला स्वस्त

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. परंतु कांद्याचे दर मात्र कमी झाले आहेत. कांद्याचे दर अचानकपणे ९ ते १२ रुपये प्रति किलोने घटले आहे.
Onion
Onionsakal
Summary

इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. परंतु कांद्याचे दर मात्र कमी झाले आहेत. कांद्याचे दर अचानकपणे ९ ते १२ रुपये प्रति किलोने घटले आहे.

नागपूर - इंधन दरवाढीमुळे (Fuel Rate) महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. परंतु कांद्याचे दर (Onion Rate) मात्र कमी झाले आहेत. कांद्याचे दर अचानकपणे ९ ते १२ रुपये प्रति किलोने घटले आहे. कांद्याचा भाजीचा तडका स्वस्त झाला आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळसह विदर्भातील इतर जिल्ह्यातील कांद्यांची आवक सुरु झालेली आहे. तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक आठवड्याला कांद्याची आवक या बाजार समितीत होते. सध्या ३० ते ३५ गाड्यांची आवक होत असून मागणी सुमार आहे. तसेच नवीन कांदाही बाजारात आल्याने भाव कमी झालेले आहे. कांद्याचे दर हे प्रतिकिलो आठ ते दहा रुपयावर येऊन ठेपला आहे. गेल्या दहा दिवसांपूर्वी २० ते २५ रुपये प्रति किलो असा कांद्याला भाव मिळत होता. पण अचानकपणे १५ ते १८ रुपये प्रति किलो असे दर किरकोळ बाजारात आहे.

बटाटे महागच

पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाट्याचे उत्पादन कमी झाले आहे. बटाटे स्टोअरमध्ये ठेवण्याची प्रक्रियाही जोमाने सुरु झालेली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात सध्या बटाट्याचे दर वाढायला सुरवात झाली आहे. या आठवड्यापासून घाऊक बाजारात बटाट्याची आवक कमी झाल्याने बटाट्याचे दर वाढले आहेत. बटाटा सध्या मात्र किरकोळ बाजारात २० ते २५ रुपये किलो झाला आहे.

नवीन कांद्यांची आवक सुरु झाल्याने गेल्या दोन ते तीन दिवसात कांद्याचे भाव कमी झालेले आहे. गेल्या आठवड्यात ६०० ते ८०० रुपये (४० किलो) कांद्याच्या पोत्याचे दर होते. ते आता २०० ते ३५० रुपयावर आलेले आहे. बटाट्याचे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढलेले आहेत.

- विश्वबंधू गुप्ता, आलू- कांदे ठोक व्यापारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com