नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोहोचवा : सुनील केदार

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुख दुःखाला समजून घेत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे त्यांच्या समस्या माहिती आहे.
नागपुरी संत्रा
नागपुरी संत्राsakal

नागपूर : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या सुख दुःखाला समजून घेत आपण मोठे झालो आहोत. त्यामुळे त्यांच्या समस्या माहिती आहे. या समस्यांवर समाधान शोधणे गरजेचे असून संत्रा फळाच्या गळतीमुळे उत्पादक सध्या त्रस्त आहे. यावर संशोधन झाले पाहिजे. नेमका उपचार शोधले गेले पाहिजे. त्यासाठी संत्रा उत्पादक शेतकरी, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ या संस्था मिळून दर महिन्याला कार्यशाळा आयोजित करतील, असे निर्देश राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले.

नागपुरी संत्रा
भोकरदनच्या नदीला पूर, जाफ्राबाद, आलापूर रस्त्यावरील पूल बंद

भारतीय कृषी अनुसंधान केंद्र अंतर्गत केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्था (आयसीएआर-सीसीआरआय) मार्फत आयोजित फळ गळती व्यवस्थापन कार्यशाळेत ते बोलत होते. व्यासपीठावर आयसीएआर -सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष, आयसीएआरचे फळबाग विभागाचे उपमहासंचालक डॉ. बी. के. पांडे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे संशोधन विभागाचे संचालक डॉ. विलास खर्चे, सीसीआरआयचे प्रमुख संशोधक डॉ. आर. के सोनकर, नागपूर कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई सहसंचालक शंकर टोटवार उपास्थिती होती.

यावेळी केदार म्हणाले, नागपूर परिसरातील संत्रा उत्पादकांच्या समस्यांचा आपला अभ्यास आहे. मात्र, यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. यासाठी ‘सीसीआरआय’ मार्फत उत्तम दर्जाच्या कलमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तसेच नागपुरी संत्र्याला जागतिक बाजारपेठ मिळाली पाहिजे. यादृष्टीने संशोधन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागपुरी संत्रा
डोंबिवली : नगरसेवकांच्याच निष्काळजी पणामुळे दिवा शीळ रस्त्याची वाट

संत्रा उत्पादकांच्या मागण्या

शेतकऱ्यांना सीसीआरआयने कलमा उपलब्ध कराव्या

अनुदान नको मात्र उपयोगी मार्गदर्शन करण्याचे आवाहन

संत्रा उत्पादनातील इस्त्रायल व स्पेनच्या जाती आयात करण्यात याव्यात

फळ पिकावर येणाऱ्या कीड-रोगांचे परिक्षण करण्यात यावे

प्रत्येक शेतकऱ्याला संत्रा उत्पादना संदर्भातील पुस्तिका देण्यात यावी

माती परीक्षण प्रत्येक तालुकास्तरावर करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी

क्रॉप न्यूट्रिशनकडे विद्यापीठाने लक्ष घालावे

पश्चिम महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकाप्रमाणे दबावगट तयार व्हावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com