Nagpur: 'पोलिस दिदी'मुळे वाढले महिलांचे बळ, अनोख्या उपक्रमामुळे नागपूरमधील पोक्सोचे गुन्हे शून्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

police order

Nagpur: 'पोलिस दिदी'मुळे वाढले महिलांचे बळ, अनोख्या उपक्रमामुळे नागपूरमधील पोक्सोचे गुन्हे शून्यावर

नागपूर: पोलिस विभागाकडून ‘पोलिस दीदी’ उपक्रमास सुरुवात करण्यात आली. गेल्या वर्षभरात या उपक्रमातचा चांगला प्रभाव पडला असून मुली आणि महिलांचे बळ वाढल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यातही वाढ झालेली आहे.

मुलींना ‘गुड टच, बॅड टच’ याची जाणिव आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचार आणि विनंयभंगाच्या गुन्ह्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पोलिस विभागाकडून ‘पोलिस दीदी’ उपक्रम राज्यभरात राबविला.

शहर पोलिस विभागाद्वारे नियोजनबद्ध पद्धतीने या उपक्रमावर भर देण्यात आला. त्यासाठी एक अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आला. त्यातून शहरातील विविध महाविद्यालये, शाळा, शिकवणी वर्ग आणि महिलांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी जाऊन त्याबाबत माहिती देण्यास सुरुवात करण्यात आली.

त्यातून गेल्या वर्षभरात मोठा बदल होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमातून १२ ते १८ या वयोगटातील अपहरण आणि मिसिंग असलेल्या मुलींना परत आणण्यात एकीकडे पथकांना यश आले असून अत्याचाराचे गुन्हेही कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे.

‘पोलिस दीदी’मुळे वाढले महिलांचे बळ

त्याबाबत माहिती देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यातून गेल्या वर्षभरात मोठा बदल होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमातून १२ ते १८ या वयोगटातील अपहरण आणि मिसिंग असलेल्या मुलींना परत आणण्यात एकीकडे पथकांना यश आले असून अत्याचाराचे गुन्हेही कमी करण्यात पोलिसांना यश आले आहे.

विनयभंग गुन्हे नोंदणीत वाढ

पोलिस दीदीचा उपक्रमाचा सर्वाधिक प्रभाव विनयभंगाच्या प्रकरणांवर झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीच्या तुलनेत या गुन्ह्यांच्या नोंदणीमध्ये वाढ झालेली आहे. त्यातून महिलांमध्ये याबाबत जागरुकता वाढल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी एप्रिल २०२१ ते २०२२ या दरम्यान १०९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. मात्र, २०२२ ते २०२३ या दरम्यान १५३ महिलांनी विनयभंगाच्या गुन्ह्यांची तक्रार विविध पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

अशी आहे आकडेवारी

गुन्हे - एप्रिल २०२१-२२ - एप्रिल २०२२-२३

अपहरण - मिसिंग - १४३ - (११४ परत आणिल्या)- १५९ (१४० परत आणल्यात)

अत्याचार - ४८ (पोक्सोसह)- ३६ ()

विनयभंग तक्रारी - ३३ (पोक्सोसह)- ४२ (पोक्सोसह)

पोलिस दीदीच्या उपक्रमातून महिला आणि मुलींमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येतात. त्यासोबत पिडित मुली वा महिलांमध्ये पोलिस यंत्रणेबाबत विश्‍वास निर्माण करण्याचे काम करण्यात येत आहे. मोठ्या गुन्ह्यावर प्रतिबंध करण्यावर दीदींना मोठ्या प्रमाणात यश आले आहे. आता महिला पोलिसांकडे तक्रारी घेऊन येतात. याशिवाय स्लम भागात या अभियानाचा विशेष भर असून त्यातून अनेक बदलही होताना दिसून येत आहे.

अश्‍वती दोरजे, सहपोलिस आयुक्त, नागपूर शहर

टॅग्स :Nagpur