esakal | नागपुरात 'सेक्स रॅकेट'वर छापा, तीन मुलींना घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

SEX-RACKET

नागपुरात 'सेक्स रॅकेट'वर छापा, तीन मुलींना घेतले ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मनिषनगरातील (manish nagar nagpur) दिलीप रेसिडेन्सी इमारतीतील पॉश फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला. या छाप्यात देहव्यापार करणाऱ्या तीन तरुणींना पोलिसांनी (nagpur police) ताब्यात घेतले तर महिला दलालाला अटक केली. प्रियंका शोएब अफजल सैय्यद (३४) असे आरोपी दलालाचे नाव आहे. (nagpur police raid on sex racket in manish nagar)

हेही वाचा: सेना, राष्ट्रवादींवर पटोलेंचे आरोप, नंतर घुमजाव; म्हणाले...

पोलिसांच्या माहितीनुसार, कुख्यात महिला दलाल प्रियंका सैय्यद ही गेल्या अनेक दिवसांपासून देहव्यापारात सक्रीय आहे. ती तरुणींना आणि अल्पवयीन मुलींना झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून देहव्यापाराच्या दलदलीत ढकलते. आंबटशौकीन ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवून ती आकर्षित करते. तिने गेल्या काही दिवसांपासून मनिष नगरातील दिलीप रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील ४०१ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये देहव्यापार सुरू केला होता. फ्लॅटवर अनेक तरुणींची गर्दी होत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय ज्ञानेश्‍वर भोसले यांना माहिती दिली. शनिवारी त्यांनी पंटर पाठवून सेक्स रॅकेट सुरू असल्याची खात्री केली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मंगला हरडे, संदीप चंगोले, राशिद खान, चेतन गेडाम, अजय पौनीकर, रिना जाऊरकर, प्रतिमा मेश्राम आणि सुजाता पाटील यांनी सापळा रचला. पोलिसांनी एक पंटर पाठवून मुलींची मागणी केली. प्रियंकाने ५ हजार रुपयांत सौदा केला. काही वेळातच तरुणीला आणि पंटरला रूममध्ये पाठविण्यात आले. पंटरने इशारा करताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा घातला. फ्लॅटमधील अन्य तीन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. तीनही तरुणी गरीब घरातील असून एक तरुणी ब्युटी पार्लरमध्ये कामाला होती. परंतु, लॉकडाउनमुळे हातचे काम गेल्याने तिच्यावर शरीर विकण्याची वेळ आली होती. या प्रकरणी पोलिसांनी प्रियंकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

loading image