गरीब देशांतील एक अब्ज जनता आजारी

आज जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगदिन; आॅनलाइन चर्चासत्र
 गरीब देशांतील एक अब्ज जनता आजारी
गरीब देशांतील एक अब्ज जनता आजारीsakal media

नागपूर : अशुद्ध पाणी तसेच अस्वच्छतेमुळे डेंगी, चिकुनगुनिया, लेशमॅनियासिस, कुष्ठरोग, हत्तीरोग, ऑन्कोसेरसियासिस, रेबीज, खरूज, सिस्टोसोमियासीस, ड्रॅकनकुलियासिस, इकिनोकोकोसिस, मानवी आफ्रिकन ट्रीपॅनोसोमियासिससह जिवाणू आणि विषाणूपासून होणारे आजार उष्णकटिबंध प्रदेशात आढळतात. उष्णकटिबंधातील गरीब देशांमध्ये सुमारे १ अब्ज लोक या आजाराच्या विळख्यात सापडल्यानंतरही या आजारांना जागतिक आरोग्य कार्यक्रमात स्थान नसल्याची भावना ट्रॉपिकल न्यूरॉलॉजी स्पेशॅलिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केली.

 गरीब देशांतील एक अब्ज जनता आजारी
न्यूयॉर्क टाइम्सने चूक केली; पेगॅसस प्रकरणी माजी अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

दरवर्षी ३० जानेवारीला जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ३०) सायंकाळी ५ वाजता ऑनलाइन चर्चासत्र घेण्यात येईल. डियन ॲकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष डॉ निर्मल सूर्या चर्चासत्राचे उद्घाटन करतील.

यात चंडीगडचे डॉ. मनीष मोदी, पुण्याचे डॉ. राहुल कुलकर्णी, डॉ. श्रीपाद पुजारी, लातूरचे डॉ. देवाशिष रुईकर, लखनौचे डॉ. राजेश वर्मा चर्चेत सहभागी होतील. उष्णकटिबंधीय आजाराच्या संशोधनाकरिता आणि उपचाराकरिता निधीचा अभाव असून यामुळेच हे आजार दुर्लक्षित राहत असतात, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com