नागपूर : सांगा, या तलावावर झाले सव्‍वातीन कोटी खर्च?

ऐतिहासिक वारसा संवर्धनाच्या नावावर उधळपट्टी, पुनरुज्जीवन झालेच नाही
Nagpur Poor work of lake at cost of crores of rupees
Nagpur Poor work of lake at cost of crores of rupees sakal

नागपूर : महापालिकेकडून शहरातील ऐतिहासिक वारसा जपण्याच्या नावावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु दूरदृष्टी, अचूक निर्णय घेण्याची क्षमताच नसल्याने कोटींच्या कोटी पाण्यात जात असल्याचे पश्चिम नागपुरातील पांढराबोडी तलावाच्या दुर्दशेवरून अधोरेखित होत आहे. या तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी आतापर्यंत सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. परंतु तलावाच्या एका बाजूला डबके दिसून येत असून संपूर्ण तलाव कोरडा पडला. एवढेच नव्हे तलावात झुडपं वाढल्याने महापालिकेने सव्वातीन कोटी रुपये कशावर खर्च केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहराचा मान वाढविण्यात येथील तलावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास शहरातील तलावांची काळजी घेण्यासाठी विविध प्रस्ताव तयार करते. त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करते. परंतु आजपर्यंत एकही तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.

पश्चिम नागपुरातील ऐतिहासिक पांढराबोडी तलावाच्या पुनरुज्जीवनाचे काम २०१४ पासून सुरू आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत पुनरुज्जीवनाचे काम सुरू करण्यात आले. यासाठी राज्य सरकारने ३.३३ कोटीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती.

राज्य शासनाकडून ७० टक्के तर महापालिकेला ३० टक्के निधी द्यायचा होता. आतापर्यंत या तलावाच्या पुनरुज्जीवनावर ३ कोटी २८ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती महापालिकेने माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिली. परंतु या तलावाची सद्यस्थिती बघितली असता काहीच काम झाले नसल्याचे दिसून येत आहे.

बेशरम, झुडपं आणि डुकरे

तलावाच्या पूर्वेकडे पाण्याचे एक डबके असून निम्म्यापेक्षा जास्त तलाव कोरडा आहे. याशिवाय तलावामध्ये बेशरम तसेच काटेरी झुडपं वाढली असून डुकरांचा वावर दिसून येत आहे. तलावाच्या किनाऱ्यावर परिसरातील नागरिकांनी कचराघर तयार केले आहे. येथेच बाभळीचे वन तयार झाले आहे. त्यामुळे महापालिकेने सव्वातीन कोटी रुपये कशावर खर्च केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सक्करदरा तलावाचेही तसेच

दक्षिण नागपुरातील सक्करदरा तलावालाही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या तलावाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून साडेतीन कोटींचा खर्च झाला आहे. परंतु या साडेतीन कोटी खर्च होऊनही तलाव जैसे थे असल्याचे एकाही अधिकाऱ्यांना दुःख नाही.

तलावाची सद्यस्थिती

  • काटेरी झाडांचा जंगल

  • एकाच कोपऱ्यात पाणी (डबके)

  • बेशरम झाडाचे झुडप

  • डुकरांचा वावर

  • परिसरातील नागरिक टाकतात कचरा

तलावावर झालेला खर्च

  • वर्ष खर्च रुपयांत

  • २०१४-१५ ७३ लाख

  • २०१५-१६ १ कोटी १८ लाख

  • २०१६-१७ ७५ लाख

  • २०१७-१८ ६२ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com