नागपूर : खासगी बसच्याआड जीएसटीची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur private bus Material transport without paying taxes

नागपूर : खासगी बसच्याआड जीएसटीची चोरी

नागपूर : आरामदायी वाहनांसह अन्य खासगी बसेसमधून वजनी सामानांच्या आड वस्तू व सेवा कर (जीएसटी) सह अन्य करांची चोरी होत असल्याची बाब उघडकीस आलेली आहे. त्यामुळे अशा बसेसची परिवहन विभागाकडून तपासणी केली जात आहे. त्यामुळे खासगी बसचे संचालन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

नागपुरातून पुणे, रायपूर, हैदराबाद, दिल्ली, नांदेड, जबलपूर, रिवा, सतना, कटनीसह अन्य ठिकाणांकरिता खासगी बसेस रवाना होतात. यात प्रवासी आणि सामानाचे वहन केले जात आहे. बाहेर जाणाऱ्या बसेसची तपासणी केल्यास त्यात जीएसटी आणि इतर करांची चोरी केली जात असल्याचे आढळले आहे. परंतु बसद्वारे अशा वस्तू सहजरित्या एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे करातून सूट मिळत आहे. अशाप्रकारे साहित्य पाठविणारे आणि ट्रांसपोर्ट व्यवसायी संगनमताने सरकारला चुना लावण्याचे काम करीत आहे. साहित्य अथवा माल पाठविणाऱ्यांसाठी ही सर्वाधिक सुरक्षित आहे. प्रत्येक वेळी प्रवासी बसेसची तपासणी होत नसल्याने लगेज लोडिंगचे कार्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

माल वाहतूक करणे गुन्हा

आरटीओ विभागानुसार नियम व कायद्याचे उल्लंघन करून अवैधरीत्या लगेज घेऊन जाणाऱ्या बसचालकांवर कठोर कारवाई केली जात असून यावर नजर ठेवली जात आहे. एकदा इशारा देऊनही असा प्रकार सुरूच ठेवल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रवासी बसमध्ये केवळ प्रवासीच बसू शकतात. बसमध्ये माल वाहतूक करणे गैरकायदेशीर आहे. खासगी आणि ऑल इंडिया परमिटवाल्या बसेसला याची परवानगी नाही.

यानंतरही खासगी बसचालक नियमांचे उल्लंघन करीत आहे. एकदा येथून बस सुटल्यानंतर ती थेट निर्धारित स्थळी जायला हवी. ठिकठिकाणी थांबून माल वाहतूक करता येत नाही. तसेच बाहेरून शहरात येणाऱ्या बसमधूनही सामान पोहचत आहे. त्याचे काही भाडे घेऊन संबंधितांना माल दिला जातो.

रेडीमेड गारमेंट्ससह विविध उत्पादनांची वाहतूक

शहरातील काही ट्रॅव्हल्स संचालक अवैधरीत्या वजनी लगेजची वाहतूक करीत आहे. जीएसटीसह अन्य कर वाचविण्यासाठी व्यवसायी खरेदी केलेला माल बसच्या माध्यमातून पाठवितात. बसमध्ये रेडीमेड गारमेंट्ससह सोनपापडी व अन्य उत्पादन पाठविल्या जात आहे. सोबतच फूल, फ्रूट्सचे बोरेही पाठविले जाते. बसची डिक्की व आतील भागातही अशाप्रकारचा माल भरला जातो. क्षमतेतेक्षा अधिक लोड झाल्यास बसेसचे अपघातही होतात. यात अनेकदा प्रवाशांना जीवही गमवावा लागतो.

प्रवासी बसमध्ये वजनी मालाची लोडिंग करणे गैरकायदेशीर आहे. बसमध्ये केवळ प्रवासीच प्रवास करू शकतात. अवैधरित्या माल वाहतूक करणाऱ्या बसेसवर आरटीओ विभागाची नजर आहे. यासाठी तपासणीसुद्धा सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

- रवींद्र भुयार, आरटीओ

Web Title: Nagpur Private Bus Gst Material Transport Without Paying Taxes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..