नागपूर रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ

अग्निपथ योजनेला युवकांचा विरोध; पोलिसांची करडी नजर
Nagpur railway station security Increase
Nagpur railway station security Increasesakal

नागपूर : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध होत आहे. उत्तर भारतात याचे लोन सर्वाधिक पसरले आहे. बिहारमधील युवक रस्त्यावर उतरले असून आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा वाढविली आहे.

संरक्षण दलांमध्ये साडेसतरा ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी सेवेची संधी देणाऱ्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरात तीव्र विरोध होऊ लागला आहे. या योजनेविरोधात अनेक राज्यांमध्ये जोरदार निदर्शने होत आहेत. बिहारमध्ये सलग चवथ्या दिवशी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आंदोलकांकडून रेल्वेगाड्या पेटविल्या आहेत. आता उत्तर भारतात आंदोलनाचे हे लोन पसरले आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांनी रेल्वे स्थानकाचा समोरील परिसर तसेच मागच्या बाजूने आणि आतील सर्व रेल्वे स्थानकावरील सुरक्षेत वाढ आठ ही फलाटावर सुरक्षेच्या कारणातून बंदोबस्त वाढविला आहे.

सकाळी ९ वाजतापासून जवळपास ५० ते ६० पोलिस कर्मचारी व अधिकारी रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात तैनात केले आहे. सर्व प्रकारच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर होती. अग्निपथ आंदोलनाची धग महाराष्ट्रासह शहरात पोहचण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात येऊन पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेगाड्यांसह स्थानक परिसरात आजपासून बंदोबस्तात वाढ केली आहे. प्रवाशांसह स्थानकांवर येणाऱ्यांवर पोलिसांची नजर होती. वरिष्ठांच्या आदेशावरून उत्तर भारतातील अलर्ट प्राप्त झाल्यामुळे रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविली आहे. रात्री पेट्रोलिंग वाढविण्यात आली असल्याचे लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनिषा काशिद यांनी सांगितले.

आंदोलनामुळे ८ गाड्या रद्द

समता एक्स्प्रेस, संघमित्रा एक्स्प्रेस, बंगळूरू हमसफर एक्स्प्रेस, बुराणी राप्ती सागर एक्स्प्रेस, सिकंदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस, अर्नाकुलम सुपरफास्ट एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नागपूर मार्गे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेकांना वेळेवर तिकीट रद्द करावे लागले. रिफंड घेण्यासाठी सुद्धा तिकीट आरक्षण कक्षात प्रवाशांना रांगेत उभे रहावे लागले. त्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक बिघडले. त्याचप्रमाणे हावडा मार्गावर काम सुरू असल्याने या मार्गावरून जाणाऱ्या काही गाड्या ३ ते ५ तास उशिरा धावल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com