नागपूर : आता आपली बसमध्ये छत्री घेऊन बसा!

छत गळतीने प्रवासी चिंब : पावसाळ्यात प्रवासादरम्यान मनस्ताप
Nagpur municipal corporation bus transport service
Nagpur municipal corporation bus transport service

नागपूर - महापालिकेच्या परिवहन सेवेतील आपली बसमध्ये आता छत्री घेऊन बसायचे काय, असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. पारडी ते वायसीसीई मार्गावरील आपली बसमधील गळतीमुळे बसलेले प्रवासी आज चिंब झाले. पूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक चाकरमाने, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या दुचाकीऐवजी महापालिकेच्या आपली बसने नोकरीच्या ठिकाणी जाण्याचा निश्चय केला. परंतु त्यांना बसमध्येही चिंब होण्याचा अनुभव आला. पारडी ते वायसीसीईपर्यंत एमएच ३१ सीए ६०३० या क्रमांकाची बस निघाली.

विविध थांब्यावरून चाकरमाने, विद्यार्थी बसमध्ये बसले. परंतु बसमध्ये आसनावर बसताच त्यांच्यापुढे गळतीपासून बचावाचे आव्हान होते. यावेळी प्रवाशांना हाताने अंगावर पडणारे पाण्याचे थेंब रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. गंतव्य ठिकाणी पोहोचेपर्यंत प्रवासी चांगलेच चिंब झाले. त्यामुळे संतापाने काही प्रवाशांनी आता बसमध्ये छत्री घेऊन बसायचे का, असा संताप व्यक्त केला. नुकताच आपली बसचे भाडे वाढले. त्यामुळे नागरिकांचा कल मेट्रोकडे वाढला. आता बसमध्येही पावसाचे पाणी शिरत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या रोडावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उन्हाळ्यात आगीच्या घटना

यंदाच्या उन्हाळ्यात तीन आपली बसला आग लागली होती. आगीच्या घटनांमुळेही नागरिकांचा मनपाच्या परिवहन सेवेवरून विश्वास उडला. आता पावसाळ्यात गळत्या बसमधून प्रवास करावा लागत आहे. यातूनच देखभाल दुरुस्तीकडे डिम्स कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट अधोरेखित झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com