नागपूर : दोन युवकांचा तलावात बुडून मृत्यू

पारशिवनी, रामटेक येथील घटना
Nagpur Ramtek Two youths death in lake
Nagpur Ramtek Two youths death in lake sakal

पारशिवनी/रामटेक : पारशिवनी येथे नदीच्या पात्रात तर रामटेक येथे तलावात बुडून दोन युवकांचा करुण अंत झाला. बुटीबोरी येथील युवक मित्रांसोबत पेंच नदीच्या पात्रात पोहायला गेला होता. मात्र, त्याचा बुडून मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाचा आजीचे अस्थीविसर्जन करताना तलावात बुडून मृत्यू झाला.

शशांक उर्फ रॉबिन मनोज तिवारी (२३, बुटीबोरी, नागपूर) हा युवक मित्रांसोबत पारशिवनी येथे पोहायला आला होता. तो नागपूर येथील तिरपुडे महाविद्यालयात एमबीएला होता. त्याच्यासोबत पाच मित्र होते. शशांक मित्रांसोबत श्री क्षेत्र घोगरा येथे दुपारी १२ च्या सुमारास फिरायला आला होता. फिरून झाल्यानंतर ते सर्व मंदिराच्या मागच्या दिशेला असलेल्या चिखली डोहाकडे गेले. सर्व मित्र नदीच्या काठावरील झाडाखाली बसले होते. अशातच मला पोहता येते असे म्हणून शशांकने गोट्यावरून डोहात उडी मारली. यानंतर तो पाण्याबाहेर आलाच नाही. ही घटना दुपारच्या सुमारास घडली.

सायंकाळी पाच वाजता पोलिसाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रामटेक येथील प्रख्यात श्री क्षेत्र अंबाळा येथे रक्षा विसर्जनासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा तलावात पाय घसरून पडल्याने करून अंत झाल्याची घटना शनिवारी अंबाळा तलावात घडली. मयूर अशोक कांबळे (वय-१९) रा. कांदापेठ, नागपूर असे मृतकाचे नाव आहे. तो त्याच्या आजीच्या अंतिम संस्कारासाठी तालुक्यातील भंडारबोडी येथे आला होता. आज शनिवारी परिवारासह अंबाळा येथे अंत्यसंस्कारासाठी आला.

दुपारच्या सुमारास तलावात उतरताना पायरीवरून पाय घसरल्याने तो पाण्यात बुडाला. दरम्यान याचवेळी त्याला वाचविण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या एकाने पाण्यात उडी घेतली. मात्र मयूरला वाचविण्यात त्याला यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळ गाठले व शोधाशोध सुरू केली. सायंकाळी ४ वाजता दरम्यान मयूरचा मृतदेह शोधून काढण्यात रामटेक पोलिसांना यश आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com