नागपूर : नोंदणी विवाहाला प्राधान्य!

नवरा-नवरी एकमेकांना ठेवतात कायद्याने बांधून, तीन वर्षात दुप्पट विवाह
Nagpur Registered marriage
Nagpur Registered marriageSakal

नागपूर : लग्नानंतर कागदपत्रे तयार करताना नियमांनुसार येणाऱ्या अडचणी लक्षात घेता व कायद्याच्या कचाट्यातून योग्यपणे बाहेर निघता यावे म्हणून विवाह नोंदणी करण्यास प्राधान्य मिळत असल्याची बाब पुढे आली आहे. तसेच पती अथवा पत्नीने पुढे चालून गडबड करू नये, यासाठीही नोंदणी विवाहाचा आधार घेतला जात आहे. गेल्या तीन वर्षांत दुप्पट नोंदणी विवाह झाले आहेत.

विवाह म्हणजे ‘दोन जिवांचे मिलन’ ही पारंपारिक म्हण आता काहीशी पुसटशी होताना दिसते आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील हा अविस्मरणीय दिवस कायद्याच्या कचाट्यात अडकू नये, म्हणून नागरिक जागरूक होत नोंदणी पद्धत अवलंबित आहे. जगातील कुठल्याही कोपऱ्यात बसलेला व्यक्ती ऑनलाइन माध्यमातून प्रमाणपत्र तपासू शकत असल्याने विवाह केल्याची पडताळणी सहज होऊ शकते. त्यानुसार, तीन वर्षांपूर्वी नोंदणी विवाहाला प्राधान्य!

(२०१९ साली)चे २ हजार ३८९ विवाह नोंदणीचे आकडे मागे पडत गेल्यावर्षी (२०२१) ३ हजार ९४४ विवाह नोंदणी झाली. तर, यंदा सहा महिन्यात (२४ जूनपर्यंत) हेच आकडे दोन हजार नोंदणीच्या जवळपास पोहोचले आहेत. यावरून, विवाह इच्छुकांचा कल आणि निर्माण झालेली जागरूकता दिसून येते.

व्हिसा, पासपोर्टसाठी वैध

अनिवासी भारतीय किंवा लग्नानंतर विदेशवारी करणाऱ्या जोडप्यांना व्हिसा, पासपोर्ट काढताना लग्न केल्याचा पुरावा मागितल्या जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून मिळालेले प्रमाणपत्र सहसा अशावेळी ग्राह्य धरल्या जात नाही. तसेच, नोंदणी पद्धतीमध्ये कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतरच प्रमाणपत्र दिल्या जाते. त्यामुळे, असे अर्जदार विवाह नोंदणीला प्राधान्य देतात.

कोरोनाकाळात आकड्यात वाढ

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळामध्ये लग्न सोहळ्यांचे आयोजन करताना मंगलकार्यालय, पाहुण्यांची संख्या अशा अनेक अडचणी निर्माण होताना दिसत होत्या. यामुळे, अनेक कुटुंबीयांनी नोंदणी पद्धतीला प्राधान्य दिले.

वारसदाराला सशक्त पुरावा

लग्नानंतर पती किंवा पत्नीचा मृत्यू झाल्यास विमा, संपत्ती आणि इतर लाभ प्राप्त करण्यासाठी वारसदाराला सबळ पुरावा म्हणून विवाह नोंदणी पद्धतीचा वापर करता येतो.

प्रोत्साहन निधीचा लाभ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीद्वेश नष्ट करण्याच्या दृष्टीने विवाह नोंदणीबाबत नियमांची रचना केली. याला अधिक प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे ५० हजार रुपये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनतर्फे २.५ लाख रुपये दिल्या जातात. हा लाभ मिळविण्यासाठी नोंदणी पद्धतीला प्राधान्य दिल्या जाते.

वर्ष विवाह नोंदणी वाढ (टक्क्यात)

  • २०१९ २ हजार ३८९ --

  • २०२० २ हजार ५२० ०६

  • २०२१ ३ हजार ९४४ ४०

  • २०२२ (२४ जूनपर्यंत) १ हजार ८८४ ६०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com