निवासी डॉक्टर कामावर संप मागे | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 निवासी डॉक्टर कामावर संप मागे

नागपूर : निवासी डॉक्टर कामावर संप मागे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : यवतमाळ मेडिकल कॉलेजमधील शिकाऊ डॉक्टरची हत्या झाल्यानंतरचे पडसाद मेयो व मेडिकलमध्ये उमटले. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने शनिवारपासून बेमुदत संप सूरू केला. मात्र प्रशासनाने सर्व मागण्यात मान्य केल्या. तसेच डॉ. अशोक पाल यांच्या हत्‍या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली. यामुळे मार्डच्यावतीने संप मागे घेण्यात आला.

मेडिकल आणि मेयोतील सर्व परिसराचे ऑडिट करून आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचे आश्वासन मिळाल्याने संप मागे घेण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण मार्डचे मेडिकलमधील प्रतिनिधी डॉ. संजय बन्सल यांनी सांगितले. संप मागे घेतला तरी सकाळच्या सत्रातील रुग्णसेवा प्रभावी झाली असून परिचारिकांशिवाय कोणीही वॉर्डात नसल्याची माहिती पुढे आली. कॅज्युअल्टीत सकाळी केवळ परिचारिका उपस्थित होत्या. डॉक्टरांच्या मागण्यांचा पाठपुरावा वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी झालेल्या चर्चेत करण्यात आला असल्याची माहिती मार्ड प्रतिनिधींनी दिली.

हेही वाचा: नागपूर : हॉटेल्स, मॉल्स सुरू, क्रीडा स्पर्धा का नाही?

नियोजित सर्जरी आज

कोविड आयसीयू, इतर आयसीयू, कोविड प्रयोगशाळेसह इतर अत्यावश्यक रुग्णसेवेत कर्तव्य बजावले. ओपीडी बंद असल्याने कॅज्युअल्टीत रुग्णांची गर्दी वाढली होती. परंतु येथे सकाळी१० वाजेपर्यंत डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली. सोमवारी नियोजित शस्रक्रीया करण्यात येणार आहेत.

"शिकाऊ डॉक्टरची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडले. तसेच मेडिकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसकर यांनी मध्यवर्ती मार्ड प्रतिनिधींना दिले. तसेच स्थानिक प्रशासनानेही या मागण्यांवर सकारात्कता दाखवल्याने संप मागे घेण्यात आला."

-डॉ. सजल बन्सल, अध्यक्ष, मार्ड,मेडिकल.

loading image
go to top