Nagpur safe from corona 82 percent people antibodies from vaccination
Nagpur safe from corona 82 percent people antibodies from vaccination Sakal

कोरोनापासून नागपूर सुरक्षित; लसीकरणातून ८२ टक्के व्यक्तींच्या शरीरात ॲन्टिबॉडीज

उपराधानीला चौथ्या लाटेचा फारसा धोका नसल्याचा दावा शहरातील वैद्यकतज्ञ्जांनी केला

नागपूर: जगभरातील तज्ज्ञ कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत विश्लेषण करत असताना नागपूर मात्र सुरक्षित शहराच्या श्रेणीत आहे. कारण शहरातील ८२ टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याने त्यांच्या शरिरात ॲन्टिबॉडीज(प्रतिपिंडे) तयार झाली आहेत. ही प्रतिपिंडे किमान वर्षभर शरिरातील विषाणूंशी लढत असतात. त्यामुळे उपराधानीला चौथ्या लाटेचा फारसा धोका नसल्याचा दावा शहरातील वैद्यकतज्ञ्जांनी केला आहे.

१६ जानेवारी २०२१ रोजी शहरात लसीकरणाला सुरूवात झाली. ६० दिवसांनी म्हणजेच १५ मार्चपासून दुसरा डोस सुरू करण्यात आला. शहरात आतापर्यंत १०० टक्के लोकांनी पहिला डोस घेतला आहे. त्याचबरोबर ७० हजार व्यक्तींनी बूस्टर डोस घेतला.

कोरोना बाधितांमध्ये नैसर्गिकरित्या अँन्टिबॉडीज तयार झाल्याचे सिरी सर्वेक्षणातून समोर आले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये दुसऱ्यांदा संसर्ग होण्याचा धोका ६ ते १२ महिन्यांपर्यंत किंचित असतो. त्याच वेळी, ८२ टक्के पात्र लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. यामुळे त्यांच्यामध्ये प्रतिपिंडे तयार झाली. परिणामी वर्षभर धोका टळला आहे. महापालिकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत शहरात शंभर टक्के म्हणजेच २० लाख ४९ हजार नागरिकांनी पहिला डोस तर ८२ टक्के म्हणजेच १६ लाख ८० हजार लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच बुस्टर डोसची संख्या ७० हजारांवर पोहोचली आहे.

येत्या काही दिवसांत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही १०० होईल, असा दावा करण्यात आला आहे. नुकतेच १५ ते १७ वयोगटातील ८४ हजार मुलांचे लसीकरण झाले. तर १२ ते १४ वयोगटातील ९०० मुलांनी लस घेतली आहे.

लस शरीरात प्रतिपिंड तयार करते. त्याचा प्रभाव किमान वर्षभर असतो. पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्यांनी लसीची तारीख पाहून वेळेवर डोस घ्यावा. त्याच वेळी, एक वर्षानंतर, बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहर सुरक्षित आहे.

-डॉ. वसंत खतकर, मुख्य पर्यवेक्षक (टीम क्लिनिकल ट्रायल्स)

सरकारने आता सर्व वयोगटांसाठी अनुक्रमिक लसीकरण सुरू केले आहे. लसीकरणानंतर, शरीरात प्रतिपिंडांच्या निर्मितीद्वारे संरक्षण होते. लसीकरणामुळेच तिसऱ्या लाटेत हानी झाली नाही.

-डॉ. आशिष ताजने, संशोधन प्रमुख (टीम क्लिनिकल ट्रायल्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com