
Nagpur : शाळा प्रवेशासाठी पालकांचीच ‘परीक्षा’
नागपूर : न्यायालयात काम करणारे एक जोडपे चक्क चार आठवड्यापासून सुटी घेऊन मुलीला शाळेत टाकण्यासाठी नजिकच्या शाळांमध्ये जाऊन चौकशी करीत आहेत. मात्र हव्या असलेल्या शाळेत प्रवेश फुल्ल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रवेशासाठी असे अनेक पालक युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे पाल्यांच्या प्रवेशासाठी जणू त्यांचीच ‘परीक्षा’ होत असल्याचे चित्र आहे. मात्र, व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळू शकतो असे चौकशीअंती उघड झाले आहे. तरीही शेकडो पालकांची अशी फरफट होत आहे.
शासनमान्य इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच सध्या पसंती दिली जाते. शाळा जून महिन्यात सुरू होतात. मात्र प्रवेश प्रक्रिया पाच महिने आधीच सुरू होते. सध्या शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश अर्जांची विक्री सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे.
हव्या असलेल्या शाळांमध्ये प्रवेश न मिळाल्यास पालक आपल्या पसंतीच्या शाळांमध्ये पाल्याला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रारंभी पाल्यांसाठी सीबीएससी, स्टेट बोर्ड, आयसीएआय येथे प्रवेश घ्यायचा यावर शिक्कमोर्तब करण्यात येते. पान २ वर
शाळा प्रवेशांसाठी पालकांचीच ‘परीक्षा’
एकमत झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे शाळांचा शोध घेतला जातो.
शहरात इंग्रजी माध्यमाच्या शेकडो शाळा आहेत. या सर्व शाळा जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यांत प्रवेश देतात. शहरातील मुंडले, सोमलवार, सेंट जोसेफ, बिशप कॉटन, टाटा पारसी, सेंट झेवियर्स, भवन्स, दिल्ली पब्लिक स्कूल, सांदिपनी,
सेंटर पॉईन्ट या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश मिळावा म्हणून पालक अधिक काळजी घेताना दिसतात. त्याचप्रमाणे काही पालक दोन ते तीन शाळांचे प्रवेश अर्ज घेऊन ठेवतात. पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश न मिळाल्यास दुसऱ्या शाळेत प्रवेश घेता येईल, अशीही सोय करून ठेवतात.
शाळेतील साधारण शुल्क
५ हजार ते १५ हजार (पूर्व प्राथमिक मराठी माध्यम शाळा)
२५ ते ४० हजार रुपये (इंग्रजी माध्यम एसएससी बोर्ड)
४०००० ते १ लाख रुपये (सीबीएससी, आयसीएआय, अन्य बोर्ड)
शहरातील शाळा सीबीएससी - ३०
इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळा ः ३७८
मराठी माध्यम माध्यमिक शाळा ः १०००