Nagpur : सुनंदा साठे उपराजधानीच्या अभिनय क्षेत्रातील आज्जी

अभिनय, लेखन क्षेत्रात वावर; सत्तरीच्या वयातही ठरल्या पुरस्काराच्या मानकरी
Nagpur Sunanda Sathe
Nagpur Sunanda Sathe

नागपूर : चित्रपट, मालिकांमध्ये नायक-नायिकांप्रमाणेच ज्यांच्या भूमिका स्मरणात राहतात ते म्हणजे आजी आणि आजोबा. दिलीप प्रभावळकर, उज्ज्वला जोग, अरुण नलावडे, जयंत सावरकर, जाहिरातींमधून घराघरात पोहोचलेले विद्याधर करमरकर (अलार्म काका) यांच्या सारख्या कलावंत आजी-आजोबांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. याच पठडीतील शहरातील ७७ वर्षीय ज्येष्ठ कलावंत सुनंदा साठे ‘आज्जी’ म्हणून कला क्षेत्रात ओळखल्या जातात.

नुकत्याच पार पडलेल्या ‘अयोध्या चित्रपट महोत्सव २०२२’मध्ये ‘कंबल’ या चित्रपटातील त्यांच्या मुख्य भूमिकेला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला. वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी केवळ हौस म्हणून नाटकांमधून अभिनय करणे सुरू केले. पुढे संहितेच्या गरजेपोटी त्यांनी कलम हाती घेतली. आज त्यांच्या नावे विविध पुरस्कार विजेत्या पंधरा नाट्यसंहिता आहेत. सुनंदा आजी यांनी शाळेत असताना पहिल्यांदा रंगमंचावर एंट्री घेतली होती. मात्र, पुढे संसार आणि प्रपंचामुळे कलेशी त्यांचा फारसा संबंध आला नाही. वयाच्या चाळीसाव्या वर्षी महिला मंडळ आणि शारदोत्सवाच्या निमित्ताने नाटक बसविणे सुरू केले. येथेच त्यांचे कलेशी नाते जुळले.

बँकेत व्यवस्थापक म्हणून कर्तव्यावर असलेल्या यजमानांच्या नोकरीनिमित्त सुनंदा साठे उपराजधानीच्या अभिनय क्षेत्रातील आज्जी झालेल्या बदलीचा काळ वगळता वयाच्या साठीपर्यंत सातत्य कायम होते. आप्तांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे साठाव्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा ‘स्वांतसुखाय’ हे दोन अंकी नाटक लिहिले.

सतरा वर्षांपूर्वी झालेल्या राज्यनाट्य स्पर्धेमध्ये ते सादर झाले आणि त्यांच्या या पहिल्याच नाट्यसंहितेला निर्मितीचे दुसरे पारितोषिक अन्‌ सुनंदा आजींना अभिनयाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यावेळी सुरू झालेली अभिनय आणि लिखाणाची घोडदौड आजही कायम असून आजवर पंधरा नाटकं त्यांनी लिहिली आहेत. या प्रवासामध्ये त्यांचे पती, मुले, मुलगी यांची मोलाची साथ लाभल्याचे त्या गर्वाने सांगतात.

नाट्यप्रवासातील महत्त्वाच्या नोंदी

  • वयाच्या ५२ व्या वर्षी नाट्य शास्त्रात पदव्युत्तर पदवी (एमएफए)

  • नाट्य परिषदेतर्फे ‘रंग सेवाव्रती पुरस्कार’

  • आकाशवाणीवर १६ नभोनाट्य प्रदर्शित

  • राज्य नाट्य स्पर्धेत १३ दोन अंकी, १३ बालनाट्य सादर

  • दहा नाट्यलेखन पुरस्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com