नागपूर : परसोडा नाल्यातील दुर्गंधीचा डोक्याला ताप

शितलवाडी-परसोडा ग्रामपंचायत परिसरात घाण पाण्याचे डबके, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
Nagpur Shitalwadi Parsoda Gram Panchayat dirty water Ponds
Nagpur Shitalwadi Parsoda Gram Panchayat dirty water PondsSakal

शितलवाडी : शितलवाडी-परसोडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्‍या शिवनगर, गुरुकुल नगर,परसोडा व शहरालगत असलेले वॉर्डातील नागरिकांना सध्या नालीच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात घाण पाण्याचे डबके साचले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याला नालीचे स्वरूप आल्याने ही समस्या उद्भवली असून या गंभीर समस्येकडे संबंधित बांधकाम विभाग व स्थानिक जिल्हा परिषद सदस्य लक्ष देत नसल्याने आरोप नागरिकांनी केला आहे. रामटेक शहरातून बसस्टॅण्ड ते किट्स कॉलेज बायपास रोडचे बांधकाम करण्यात आले. यामुळे तीन किमी अंतर कमी झाले.

कालांतराने या मार्गावर दोन ठिकाणी रपट्यांचे बांधकाम झाले. ते सध्या कोणत्याही उपयोगाचे राहीले नाही. नाला खोल तर रपटे वर झाल्याने याठिकाणी डबके साचते. या डबक्यांमुळे दुर्गंधी सुटत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. रस्त्याचे बांधकाम दोनदा झाले.डांबरीकरणही झाले. मात्र नाली तयार केली गेली नाही. शिवनगराच्या गेटलगत कच्ची नाली आहे . परंतु तिथे पाणी निघायला मार्ग नाही. शितलवाडी ग्रामपंचायती अंतर्गतच्या या वॉर्डात ठिकठिकाणी सांडपाणी साचून राहते. ग्रामपंचायतीने केलेल्या नाल्यांमधून पाणी वाहून जात नाही.शिवाय ग्रामपंचायत संबंधित बांधकाम विभागाच्या हद्दीत काम सुरू नाही. त्यामुळे ही समस्या गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित आहे.

पावसाळ्यात घरांमध्ये शिरते पुराचे पाणी

या नाल्यातील पाणी वाहून जात नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात या भागात पूर येतो.यामुळे परिसरातील घरामध्ये पुराचे पाणी शिरते. ऐन पावसाळ्यात समोर नाल्या बाजूची झाडे तोडून ते नाल्यातच टाकले असल्याने पावसाळ्यात पुराचा फटका बसणार आहे. ही समस्या सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने समस्या ‘जैसे थे’ आहे.

अपघाताची शक्यता

रस्त्यावरील रपट्यावर कोणतेही संरक्षण कठडे लावले नाही .तसेच या रस्त्यावर दोन ठिकाणी मोठे खड्डे आहेत.पावसाळ्यात या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com