नागपूर : शिवबंधन ठेऊन शिवसैनिकांचा स्वतंत्र बाणा

गटबाजीमुळे असंतोष : प्रसंगी परिणाम भोगण्याचीही तयारी
Nagpur shiv sena workers opening new independent Organization
Nagpur shiv sena workers opening new independent Organizationsakal

नागपूर : नवे पदाधिकारी विचारत नाही आणि मुंबईचे वरिष्ठ दखल घेत नसल्याने शेकडो शिवसैनिकांनी आता ‘शिवबंधन’ कायम ठेऊन संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्रपणे राजकारण आणि समाजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. याच आठवड्यात नव्या संघटनेची स्थापना करून आंदोलनाचा बिगुल वाजविण्यात येणार असल्याचे समजते.

आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर संपर्क शिवसेनेची धुरा सोपवण्यात आली तेव्हापासून संघटनेचे चांगलीच खदखद वाढली आहे. निष्ठावंत विरुद्ध नवनियुक्त असा वाद निर्माण झाला असून तो टोकाला पोहचला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी कार्यकारिणी जाहीर केली तेव्हा अनेकांनी पदभार स्वीकारण्यास नकार दिला. डिमोशन केल्याने शेखर सावरबांधे जय महाराष्ट्र करून हातावर घड्याळ बांधले. अनेक माजी जिल्हा प्रमुख पडद्याआड गेले आहेत.

आमची वेळ येऊ तेव्हा बोलू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना सोडायची नाही आणि समाजकार्यही सुरू ठेवायचे याकरिता दीडशे ते दोनशे शिवसैनिकांची नुकतीच एक बैठक झाली. आपले म्हणणे वरिष्ठांना कितीही पटवून दिले तरी कोणी दखल घेणार नसल्याने स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. याकरिता एका माजी जिल्हाप्रमुखाने पुढाकार घेतला असल्याचे समजते.

शिवसेनेला धक्का बसण्याची शक्यता

पक्षाने दखल घेतली तर चांगले, नाही तर होणाऱ्या शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जायची तयारीसुद्धा शिवसैनिकांनी ठेवली आहे. सध्या संघटनेच्या नामकरणाचा विचार केला जात आहे. शिवसैनिकांच्या स्वतंत्र बाण्यामुळे मात्र शिवसेनेला येत्या महापालिकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com