नागपूर : क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा; १७ जणांच्या नोकऱ्या गेल्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Sports certificate scam

नागपूर : क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा; १७ जणांच्या नोकऱ्या गेल्या!

नागपूर - ‘सकाळ’ ने पाठपुरावा केलेल्या राज्यातील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यातंर्गत राज्यातील १७ जणांना शासकीय सेवेतून कमी करण्यात आले असून तब्बल ९२ जणांचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल रद्द करण्यात आले आहेत. यापैकी २७ जणांच्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी नागपूर विभागात झाली होती. हे सर्व २७ जण पॉवरलिफ्टिंग खेळातील आहेत. यापैकी दोघे जण नागपुरातच कार्यरत आहेत. अहवाल रद्द करण्यात आल्यानंतर संबंधित विभाग या उमेदवारांवर काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

स्पोर्ट्स कोट्यातंर्गत हे उमेदवार नोकरीस लागले होते. अहवाल रद्द करण्यात आल्याने या ९२ जणांच्या नोकरीवर आता गदा येण्याची शक्यता आहे आहे. क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही यादी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. अहवाल रद्द झाल्यास अशा उमेदवारांवर कारवाई करण्याची सूचना यापूर्वीच संबंधित विभागाला देण्यात आली होती, अशी माहिती काही दिवसापूर्वी बकोरिया यांनी दिली होती. यात प्रामुख्याने सॉफ्टबॉल, सेपक टकरा, तलवारबाजी, पॉवरलिफ्टिंग, ट्रॅम्पोलिन, कनोईंग या खेळांच्या प्रमाणपत्रांचा समावेश आहे.

`सकाळ''ने हा प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणल्यानंतर क्रीडा आयुक्तांनी अनेकांना स्वतःहून खोटी प्रमाणपत्र असल्यास सादर करण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणात नागपूर विभागाचे तत्कालीन क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्यासह राज्यातील काही जणांना अटक करण्यात आली होती.

‘सकाळ’ ने केला होता पाठपुरावा

क्रीडा घोटाळ्यासंदर्भात दैनिक ‘सकाळ’ने गेल्या दोन वर्षांत सात्यत्याने पाठपुरावा केला. यामुळे राज्य क्रीडा खात्याने याची गंभीरतेने दखल घेत चौकशी सुरू केली. तसेच बीड, सांगली,औरंगाबाद येथून काही जणांना अटकही करण्यात आली होती.

Web Title: Nagpur Sports Certificate Scam 17 People Lost Jobs Verification Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..