नागपूर : बेटा, तुला मिळालेली वही शेवटची!

मुलीला घरी सोडल्‍यावर वडिलाची आत्महत्‍या : कार शोरूममधील अधिकाऱ्याचे डेपोसमोर विषप्राशन
Nagpur suicide case
Nagpur suicide casesakal

नागपूर : मोहन दशपुत्रे यांनी मरणाच्या दारात उडी घेण्याचा पक्का निर्णय केला. ते मुलीला घेऊन कॉटनमार्केटला खरेदीसाठी गेले. तिच्यासाठी वही खरेदी केली. सोबतच एका दुकानातून कीटकनाशकही विकत घेतले. ‘ही तुझी शेवटची वही’ असे बोलत मुलीली घरी सोडले. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास पित्याने कीटकनाशक प्राशन करीत जगाचा निरोप घेतला.

मोहन अशोक दशपुत्रे (वय ४६,रा. आयचित मंदिराजवळ,महाल) हे शहरातील कार शोरूममध्ये अधिकारी म्हणून काम करीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन गेल्या काही दिवसांपासून तणावात होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. मंगळवारी सायंकाळी ते मुलीला घेऊन खरेदीसाठी कॉटनमार्केट येथे आले. मुलीला वही खरेदी करून दिली. ही तुझी शेवटची वही,असे ते मुलीला म्हणाले. तसेच अन्य एका दुकानातून कीटकनाशकही घेतले. त्यानंतर त्यांनी मुलीला घरी सोडले. ते वर्धा मार्गावरील ‘आपली बस’ डेपोसमोर गेले. तेथे विष प्राशन केले. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या मोबाईलवर संपर्क साधून विष प्राशन केल्याची माहिती दिली. त्यांच्या पत्नीने लगेच भाचा शुभम कडू याला तेथे जाण्यास सांगितले.

शुभम तेथे पोहोचला. त्याने मोहन यांना एम्समध्ये दाखल केले. उपचारादरम्यान मोहन यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस उपनिरीक्षक सुशील धमदर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मुलीच्या ध्यानीमनीही नव्हते

मोहन यांनी कॉटेन मार्केटमध्ये मुलीसाठी वही आणि दुसऱ्या दुकानातून कीटकनाशकाची बॉटलही विकत घेतली. पण बॉटल का आणि कशासाठी घेतली? हे मुलीच्या ध्यानातही आले नाही. काही वेळानंतर बाबा या जगात नसतील, हे मुलीच्या मनातही नव्हते. मात्र, नियतीच्या मनात वेगळेच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com