नागपूर : दहा टन कोळसा चोरून नेताना पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Ten tonnes illegal coal transport caught 16 lakh confiscated

नागपूर : दहा टन कोळसा चोरून नेताना पकडले

कन्हान : गोंडेगाव खोल खुली खाण येथील दहा टन कोळसा चोरी करून ट्रकमध्ये नेताना प्रभारी सुरक्षा अधिकार्याने भाटिया बंद कोल वॉशरीजवळ पकडले. कन्हान पोलिसांनी ट्रकसह १० टन कोळसा असा एकूण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, रविवार च्या रात्री १२ वाजता वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी नागनाथ चरणदास खोब्रागडे हे गोडेगाव खुली खाण परिसरात गश्‍त घालत होते. त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक शिवमुरत कुरील, आशिष घोपटे, अधिकरण बेहुने होते.

मध्यरात्री ३ वाजता गुप्त माहितीनुसार गोडेगाव वस्तीच्या मागून ट्रक ( क्र. एम एच ४० बीजी ५३४३) मध्ये चोरीचा कोळसा भरून नेत असल्याचे कळले. ट्रक थांबवून चोकशी केल्यावर हा प्रकार उजेडात आला. ट्रक चालक दीपक रमेश भुनेश्वर ( ३१ वर्ष ) रा. बिना संगम खापरखेडा यास पकडून पाहणी केली असता अंदाजे एक लाखाचा १० टन कोळसा ट्रकमध्ये आढळला.

हा चोरीचा कोळसा उमेश पानतावने रा. कांद्री-कन्हान याचा असल्याचा चालकाने सांगून कागदपत्र नसल्याचे सांगितले. यानंतर ट्रक चालक व कोळशासह ट्रक ताब्यात घेण्यात आला. कन्हान पोलिस ठाण्यात नागनाथ खोब्रागडे यांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी ट्रक व कोळसा असा एकुण १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी ट्रक चालक व उमेश पानतावने राह. कांद्री-कन्हान या दोघांविरुद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान ठाण्याचे नापोशी रामेलवार पुढील तपास करीत आहे.

Web Title: Nagpur Ten Tonnes Illegal Coal Transport Caught 16 Lakh Confiscated

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NagpurpoliceCoalTransport
go to top