Nagpur : ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी फाडले कर्नाटकचे होर्डिंग्ज

बोंमई सरकार मुर्दाबादच्या घोषणा : मुख्यमंत्र्यांवरही केली टीका
Nagpur
Nagpur

नागपूर : कर्नाटक सरकारने सातत्याने महाराष्ट्राला डिवचल्याने संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आज विमानतळ मार्गावर लावलेले कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाचे होर्डिंग्ज फाडले. यावेळी शिवसैनिकांनी ‘कर्नाटक सरकार मुर्दाबाद’च्या घोषणा देतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली.

कर्नाटक सरकारच्या पर्यटन विभागाने वर्धा रोड ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या मार्गावर ‘चला कर्नाटक नव्याने पाहूया’ असे होर्डिंग्ज शनिवारी रात्री लावले. ही बाब उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या लक्षात येताच रविवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात येण्याच्या काही वेळेपूर्वी त्यांनी विमानतळ परिसर गाठला आणि कर्नाटक सरकारचे सर्व होर्डिंग्ज फाडून संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री आज शहरात येणार असल्याने जाणीवपूर्वक हे होर्डिंग्ज कर्नाटक सरकारने लावल्याचा आरोप उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केला. मुख्यमंत्री भाजपसोबत सत्तेत असल्याने उदासीन असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. राज्य सरकारने स्वतःहून होर्डिंग्ज न काढल्यास शिवसैनिक काळे फासेल, असा इशाराही तिवारी यांनी दिला. यावेळी शहरप्रमुख दीपक कापसे, ज़िल्हा संघटक सुशीला नायक, शहर संघटक मंगला गवरे, मुन्ना तिवारी, नीलिमा शास्त्री, प्रीतम कापसे, विशाल कोरके, अंकुश भोवते, गजानन चकोले, अब्बास अली, आशिष हाडगे, सोनू शाहू, सलमान खान, दीपक पोहनेकर, शैलेंद्र आंबिलकर, सुरेंद्र आंबिलकर, ललित बावनकर, सोनू शेख़, विष्णू पोटफोडे, श्रीकांत खंडाडे, किरण शेडके, गौरव मोहोड, कार्तिक नारनवरे, राजेश वाघमारे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com