Nagpur : व्यापाऱ्याच्या कारमधून दारू साठा जप्त Nagpur trader car Liquor stock seized | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारू

Nagpur : व्यापाऱ्याच्या कारमधून दारू साठा जप्त

नागपूर : पार्टीसाठी कारमध्ये महागडी विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या सराफा व्यापाऱ्याला पेट्रोलिंगदरम्यान काचीपुरा चौकात मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास बजाजनगर पोलिसांनी अटक केली. त्याचाकडून ३८ हजारांचा दारूचा साठा जप्त केला.

विक्रम गर्ग (वय २८ रा. गोमती हॉटेलमागे, कळमना)असे आरोपी व्यापाऱ्याचे नाव आहे. बुधवारी रात्री पार्टीच्या अनुषंगाने तो रामदासपेठ येथून कारने (एमएच ३१, एफआर १७३९) काचीपुरा चौकातून जात होता. तेव्हा पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी त्याला थांबविले.

दरम्यान त्याच्या कारची तपासणी केली असता, डिक्कीत महागड्या दारूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. त्याला परवान्याची विचारणा केली असता, त्याच्याकडे तो नसल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत, ठाण्यात आणले. याशिवाय ३८ हजारांची दारूही जप्त करून गुन्हा दाखल केला.