नागपूर : वीज पडून महिला शेतमजुराचा मृत्यू

उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारातील घटना
Nagpur Umred farmer Woman death in lightning
Nagpur Umred farmer Woman death in lightningsakal

उमरेड : मंगळवारी उमरेड तालुक्यातील लोहारा शिवारात दुपारी शेतात काम करीत असलेल्या महिलेवर वीज पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यात मॉन्सून सक्रिय झाला असून शेतीच्या, सोयाबीन पेरणीच्या व कापसाची लावणी करण्याच्या कामाला गती मिळाली. यंदाच्या पावसाळी हंगामात अंशतः बदल झाले असून प्रचंड मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस बरसतो. मात्र शेत शिवारात वीज पडून जनावरे व मजुरांचा जीव जाण्याच्या घटना दररोज घडत आहेत.

संदीप गजानन मांडवकर (वय३२, कळमना, ता. उमरेड) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार उषा वीरेंद्र मांढळकर (वय ५०, दत्त मंदिर जवळ, ईतवारीपेठ) या लोहारा शिवारात मंगळवारी दुपारच्या सुमारास संदीप मांडवकर यांच्या शेतात पऱ्हाटीची लावण करीत असताना मुसळधार पाऊस सुरु झाला. पावसापासून बचावासाठी अन्य १३ शेतमजुरांसोबत महिला शिवारातील झाडाखाली उभे राहिले. अशात वीज पडून त्या विजेचा धक्का लागून शेतमजुर महिला जखमी झाली. उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू तिचा मृत्यू झाला. अन्य जखमी मजुरात सुहानी भट (वय१६, कावरापेठ, उमरेड), रेणुका विजय हत्तीमारे(वय३४, मंगळवारीपेठ, उमरेड) यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com