Nagpur Update : शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला उद्धव, आदित्य ठाकरेंचा फोटो हटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाश शिंदे

Nagpur Update : शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला उद्धव, आदित्य ठाकरेंचा फोटो हटला

नागपूर : अधिवेशनात शिवसेना पक्ष कार्यालय शिंदे गटाला मिळाला असून बाळासाहेबांची शिवसेना असा बोर्डही लागला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो काढून फक्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटा लावण्यात आला आहे.

एकनाश शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे दोन गट पडले. एकनाश शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली. मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात आली. त्याच प्रमाणे त्यांना शिवसेनेच्या धुनष्यबाणावरही दावा केला. हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना विधिमंडळातील धनुष्यबाण चिन्ह झाकण्यात आले. येथील कार्यालयावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता.

या कार्यालय दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला होता. दरम्यान विधिमंडळ सचिवालयाने हे कार्यालय प्रथम ठाकरे गटाला दिले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यासह बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही लावण्यात आला होता. परंतु आज कार्यालयातील चित्र बदलले होते. कार्यालयात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा फोटो ऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होतो. शिवाय प्रतोद म्हणून शिंदे गटातील नेत्याचे नाव होते. तर एका कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी लागली होती.