नागपूर : तीन वर्षांत ४९ हजार कर्करुग्णांवर उपचार

मेडिकलमधील वास्तव : तरीही कॅन्सर इन्स्टिट्यूटचा विषय बेदखल, कोरोना रुग्णांपेक्षा कर्करुग्ण अधिक
Nagpur vidarbha cancer patients Treatment
Nagpur vidarbha cancer patients Treatmentsakal

नागपूर : विदर्भाला मोठ्या प्रमाणात कॅन्सरने विळख्यात घेतले असून एकट्या मेडिकलमध्ये ३ वर्षांत ४९ हजार कर्करुग्णांची नोंद झाली. यापैकी २१६ जणांचा कॅन्सरने मृत्यू झाला. विशेष असे की, याच काळात कोरोनाची महामारी असतानाही कोरोना रुग्णांपेक्षा कॅन्सरच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या ३५ हजार रुग्णांवर येथे उपचार झाले. त्या तुलनेत ४९ हजार कर्करुग्णांवर उपचार झाले. यामुळे विदर्भात कोरोनापेक्षा भयावह कॅन्सर आहे. तरीही मेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रश्न शासनाकडून रेंगाळत ठेवण्यात येत आहे.

१ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांत मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर, कोरोना, डेंगी तसेच स्वाईन फ्लूच्या रुग्णांनी उपचार घेतले. शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागितललेल्या माहितीतून मेडिकलमध्ये तीन वर्षांत ४९ हजार कर्करुग्णांपैकी २१६ जण कॅन्सरने दगावल्याचे पुढे आले. तर कोरोनामध्ये ३५ हजार ९५१ रुग्णांवर उपचार घेतले. यातील ४१३२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

२०१९ नंतर मेडिकलमध्ये स्वाईन फ्ल्यूचा एकही रुग्ण दाखल झाला नाही. तर डेंगीच्या १ हजार ८९२ रुग्णांवर उपचार झाले. यात २ जणांचा मृत्यू झाला. कोरोनासह इतर आजारातून रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी शासनाकडून मेडिकलला तब्बल ४७७ कोटी ७० लक्ष २५ हजार ९०० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले.

मेडिकलमध्ये रिक्त पदे

  • वर्ग १ व वर्ग २ संवर्ग मंजूर पदे ५० ३१ पदे भरलेली १९ पदे रिक्त

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ मंजूर पदे ७ ३ पदे भरलेली ४ पदे रिक्त

  • तांत्रिक संवर्ग मंजूर पदे १२० ४५ पदे भरलेली ७५ पदे रिक्त

  • चतुर्थ श्रेणी संवर्ग मंजूर पदे ८२८ ४०८ पदे भरलेली ४२० पदे रिक्त

  • परिचारिका संवर्ग मंजूर पदे ११६२ ९६३ पदे भरलेली १९९ पदे रिक्त

मेडिकलमधील एकूण मृत्यू

  • २०१९ ५ हजार ९९५

  • २०२० ७ हजार ४४१

  • २०२१ ७ हजार ३८८

  • २०२२ १ हजार २२२

(मार्च पर्यंत)

मेडिकल

  • कॅन्सरचे रुग्ण - ४९ हजार - २१६ मृत्यू

  • कोरोना रुग्ण - ३५ हजार -४१३२ मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com