Nagpur : VIP कल्चर वाढल्याने बाउंसरचे चांग भले Nagpur VIP culture Bouncers are doing | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाउंसर

Nagpur : VIP कल्चर वाढल्याने बाउंसरचे चांग भले

नागपूर : लग्नसोहळ्यासह शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल वाढलेली आहे. या कार्यक्रमांचे आयोजक नागरिकांचे लक्ष वेधले जावे म्हणून सभोवताली खासगी रक्षकांचा(बाउंसर) ताफा घेऊन मिरवतात. त्‍यामुळे सध्या बाउंसरची मागणी वाढली आहे. २००७ पर्यंत हे खासगी पब्समध्ये दिसत होते. परंतु अलीकडे त्यांचे कार्यक्षेत्र वाढले आहे.

अनेक बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आणि राजकीय नेते पिळदार शरीर असलेले काळ्या कपड्यांतील बाउंसर सोबत घेत कार्यक्रम करीत आहेत. हे बाउंसर कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी घेतात. तर काही नुसतेच आयोजकांच्या पुढे मागे करतात. अनेक चित्रपट कलाकार आपल्यासोबत बाउंसर बाळगतात. त्यांच्या कामाचे तास ठरले असून सहा तासांकरिता एका बाउंसरला लग्नसराईत

व्हीआयपी कल्चर वाढल्याने बाउंसरचे चांग भले

हजार ते बाराशे रुपये मिळतात. मात्र राजकीय मेळावे व खासगी स्वरक्षणासाठी परिस्थितीनुसार दर बदलतात. सहा तासांपेक्षा जास्त काम करायचे असल्यास त्याचा वेगळा मोबदला मिळतो. याशिवाय त्‍यांच्यासाठी पौष्टिक जेवणाची व्यवस्थाही करावी लागते.

यात काम करणारे कोण ?

जिम इन्स्ट्रक्टर, सुशिक्षित बेरोजगार, तरुण पूर्णवेळ या क्षेत्रात काम करताना दिसतात. बाउंसरचे काम करणाऱ्यांकडे उत्तम शारीरिक तंदुरुस्ती, स्मार्ट चेहरा, उत्तम अ‍ॅटिट्यूड आणि नजरेत जरब या गोष्टी असायला हव्यात. बाउंसरचे काम करण्यासाठी शिफ्ट ड्यूटीत काम करण्याची तयारी हवी. अनेकदा सहा तास उभे राहून काम करावे लागते. शिवाय कार्यक्रम अधिक वेळ चालल्‍यास त्‍यांना न थकता कार्यरत राहावे लागते.

फिटनेसची गरज

शहरात सध्या तीन ते चार कंपन्या कार्यरत असून त्या आवश्यकतेनुसार बाउंसर तैनात करतात. पावसाळ्यात काम कमी असते. उर्वरित आठ महिने मात्र कामाची कमतरता नसते. कंपन्या गरजेनुसार बाउंसरला बोलावतात. मजबूत बॉडीसह बॉडी लँग्वेज आणि योग्य वागणुकीसाठी त्यांना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जाते.

मी पंतप्रधानांच्या ताफ्यात काम केलेल्या सुरेंद्र ठाकरे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. ते आपल्या सहकाऱ्यांना प्रसंगानुसार प्रशिक्षण देत असतात. बाउंसरला फिटनेससाठी नियमित व्यायाम आणि खानपानावर विशेष लक्ष द्यावे लागते. या व्यवसायात शहरात जवळपास २५० तरुण आणि १०० तरुणी कार्यरत असल्याचे बाउंसरचा पुरवठा करणारे विवेक केळझरकर यांनी सांगितले.

चाय से किटली गरम

बाउंसर्सचे मुख्य काम राजकीय नेते, सेलिब्रिटी अथवा श्रीमंत व्यक्तीच्या सभोवती सुरक्षा कवच तयार करून गर्दीपासून रक्षण आहे. ज्या व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते, त्‍याच्यासोबत सतत वावरावे लागते.

काही वेळा ‘चाय से किटली गरम’ या उक्‍तीप्रमाणे सेलिब्रिटींच्या सोबत असलेले बाउंसर लोकांना धक्काबुक्‍की करतात. विशेष करून मीडिया आणि बाऊन्सरमध्येही अनेकदा हातघाईवर येण्याचे प्रसंग घडले आहेत.