नागपूर : अत्याचाराच्या घटनांमध्ये ३० टक्क्याने वाढ

प्रेमसंबंधातून सर्वाधिक घटना ः सामाजिक व्यवस्थेला धोका
Nagpur women atrocities increased by 30% Police statement
Nagpur women atrocities increased by 30% Police statementsakal

नागपूर : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक घटना या प्रेमसंबंधातून होत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षीही राज्यात सर्वाधिक महिला अत्याचारात नागपूर पुढे असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये सातत्याने महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामध्ये नागपूरच्या आकड्यातही सातत्याने वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ६८ गुन्हे पोलिसांनी दाखल करुन घेतले होते.

त्यात यावर्षी एप्रिल महिन्यांअखेर पोलिसाकडे ८८ अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ही वाढ किमान तीस टक्क्यांची दिसून येते. यात सर्वाधिक अत्याचाराच्या घटना या प्रेमसंबंधातून घडल्याचा दावा पोलिसांनी केला. याउलट मुली, तरुणी आणि महिलांच्या विनयभंगाच्या प्रकारात थोडीफार घट दिसून येते गेल्यावर्षी २०२१ मध्ये ११६ तर यावर्षी १०८ विनयभंगाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे चिमुकल्यावरही होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून शहरात वाढले आहेत. गेल्यावर्षी शहर हे या गुन्ह्यांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर होते. दुसरीकडे मुलांचे अपहरणाच्या (बेपत्ता होणे) १४८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. गेल्यावर्षी हीच संख्या १४५ इतकी होती.

प्रेमसंबंधातून घटना अधिक

गेल्या वर्षभरात विनयभंग वा बलात्काराच्या घटनांमध्ये बहुतांशी घटना या प्रेमसंबंधातून घटल्याचे दिसून येत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळून त्या माध्यमातून हे प्रकार अधिक होत असल्याचे दिसून येते. याशिवाय घरातील वा कुटुबातील व्यक्तींच्या माध्यमातून विनयभंग होण्याचे प्रकार अधिक असल्याचे दिसून येते.

आकडेवारी (एप्रिलपर्यंत)

अत्याचार - ८८

विनयभंग - १०८

अपहरण (बेपत्ता) - १४८

बलात्कार, विनयभंग आणि पोक्सो कायद्यांतर्गत घटनांमधून समाजात मानसिक विकृती फोफावत चालली असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अशा घटना घडत असून यामागे सोशल मिडियावर वाढत चाललेला वावर हे सर्वाधिक मोठे कारण आहे. याबाबत समाजात जागृती करणे आणि सक्षमीकरण करणे आवश्‍यक आहे. विशेष म्हणजे त्यांनी होणाऱ्या अत्याचाराबाबत समोर येऊन तक्रार करावी.

- मंगला महाजन, समुपदेशक व सचिव (शालीनीताई बहुउद्देशिय शिक्षण संस्था)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com