Nagpur : स्त्रीचे वर्णन कल्याणकारी,‘ती’च्यासोबत वागणूक मात्र विरोधी

अंबाझरी परिसरात महिलांना वाटते सर्वाधिक धास्ती; रस्त्यांवर फिरणे अवघड
women
womensakal

सृष्टिस्थिति विनाशानां शक्तिभूते सनातनिगुणाश्रये गुणमये नारायणि नमोs स्तुतेसृष्टी संवर्धन आणि विनाशाची तूच शक्ती आहे. तुला नमस्कार, असे वर्णन मार्कंडेय पुराणातील श्री दुर्गासप्तशतीमध्ये केले आहे. देवीच्या अर्थात सृजनशक्ती असलेल्या स्त्रीच्या रूपाचे हे वर्णन. स्त्रीमधील शक्तीच्या कल्याणकारी स्वरूपाचे आदरार्थी अर्थाने केलेले हे वर्णन असले तरी प्रत्यक्ष स्त्रीप्रती लोकांचा ‘रवय्या’ याविरोधात दिसतो.

धरमपेठ झोनमधील ४२,७७८ घरांपैकी १२,२८३ कुुटंबांशी म्हणजे २९ टक्के कुटुंबांसोबत प्रत्यक्ष संपर्क करून ‘सकाळ’च्या पुढाकाराने सर्वेक्षण केले. विषय होता ‘रस्त्यांवरून चालताना महिलांना सुरक्षित वाटते का?’ या सर्वेक्षणातून धक्कादायक तत्थ्य उघडकीस आले. धरमपेठ झोनमधील ४० टक्के महिलांनी रस्त्यांवरून चालणे सुरक्षित नसल्याचे मत व्यक्त केले. शहरातील रस्ते रुंद, आकर्षक झाले तरी त्यावरून महिलांना चालणे सहज नाही. २५ टक्के महिलांनी सुरक्षा पुरेशी नसल्याचे नमूद केले. तर ३५ टक्के महिलांनी परिसर सुरक्षित असल्याचे मत नोंदविले.

धरमपेठ_झोन

अंबाझरी परिसरात फिरणे डेंजर शंकरनगर, अंबाझरी, दाभा, रविनगर, वायुसेनानगर व व्हीएनआयटी परिसरात सर्वेक्षण करण्यात आले होते. या स्थितीत आजही फारसा बदल झालेला नाही. अंबाझरी परिसरातील सर्वाधिक ४९ टक्के महिलांनी त्यांच्या परिसरात फिरणे सुरक्षित नसल्याचे नमूद केले. दाभा, वायुसेनानगरातील प्रत्येकी ३७ टक्के महिलांना परिसर सुरक्षित नसल्याचे वाटते तर व्हीएनआयटी, रविनगर व शंकरनगर परिसरातील अनुक्रमे ४०, ४१ व ४२ टक्के महिलांना त्यांचा परिसर असुरक्षित वाटत आहे.

अंबाझरी_गिट्टीखदान_सदर_पोलिस

पॉश वस्‍त्या; पण सुरक्षेची बोंबाबोंब उच्चभ्रू नागरिकांच्या वस्तीचा समावेश असलेल्या धरमपेठ झोनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न कायम आहे. विनयभंग वा अत्याचाराच्या या घटना कमी असल्या तरी चेनस्नॅचिंग आणि महिलांना लुटण्याची प्रकरणे सातत्याने घडत असल्याचे दिसून येते. झोनमध्ये अंबाझरी, गिट्टीखदान, सदर पोलिस ठाण्याचा समावेश होतो. मात्र, यापैकी अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यात सर्वाधिक प्रत्येकी तीन महिला अत्याचार आणि विनयभंगाचे गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे, हजारीपहाड आणि गवळीपुरासारख्या वस्त्यांचा समावेश असताना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात केवळ तीन घटना घडल्या. याशिवाय सदरमध्ये महिलांचे मंगळसूत्र लुटणे आणि विनयभंगासारख्या घटना घडल्या आहेत. गिट्टीखदानमध्ये विनयभंगाच्या दोन तर अत्याचाराची एक घटना घडली. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात लुटमारीच्या दोन घटनांची नोंद झाली. सदरमध्ये विनयभंग व अत्याचाराच्या अनुक्रमे दोन व एक घटना घडली. लुटण्याच्या दोन महिन्यात दोन घटना घडल्या.

भंगारवाले अरेरावी करतातपरिसरात पथदिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे रात्री बाहेर निघण्यास भीती वाटते. बाजूलाच गोरेवाडा जंगल असल्याने सायंकाळपासूनच भीती वाटायला लागते. वस्तीमध्ये अनोळखी भंगारवाले फिरतात. मोठमोठ्याने लाऊडस्पीकर वाजवतात. त्यांना हटकले तर ते अरेरावी करतात. वस्तीत कुत्र्यांचा सुळसुळाट झाल्याने वॅाकिंगला जाणे शक्य होत नाही.

- संध्या कोसेकर, दाभा

रस्त्यांवरचे कुत्रे गेटमधून शिरतात

कॅालनीमध्ये कुत्र्यांचे प्रमाण जास्त असल्याने एकटे बाहेर जाण्याची भीती वाटते. परिसरात सुरक्षेचा अभाव आहे. आमच्या येथे दोनदा चोरी झाली. तसेच परिसरात अनोळखी व्यक्ती फिरत असतात. गेट उघडून कुणाच्याही घरी शिरतात. कारण विचारले की, घर भाड्याने शोधत असल्याचे सांगून उद्धटपणा करतात.

- धारणा निर्मल अवस्थी, ईश्वरनगर चौक

पोलिसांवर किती अवलंबून राहावे?

आमच्या परिसरात कुठलाही त्रास नसल्याने सुरक्षित वाटते. पोलिसांची गस्त व्यवस्थित होत असल्याने रात्रीही बाहेर फिरू शकतो. बाहेर जाताना थोडी फार काळजी तर घ्यावीच लागते. महिलांनी आलेल्या संकटावर मात करण्यासाठी खंबीर होण्याची गरज आहे. प्रत्येकवेळी सुरक्षेसाठी पोलिस किंवा इतरांवर अवलंबून राहू नये.

- मोनाली गायकवाड, हजारीपहाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com