नागपूर : मॅट्रोमोनियल ॲपद्वारे घातला युवतीला गंडा

अडीच लाखांची फसवणूक : सदर परिसरातील घटना
 Matromonial app woman fraud
Matromonial app woman fraudsakal

नागपूर : सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ३१ वर्षीय युवतीची मॅट्रोमोनियल अॅपद्वारे २ लाख ५२ हजाराने फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम नगर, गद्दीगोदाम येथे राहणाऱ्या निकीता राहुल सहारे यांनी ३ वर्षांपूर्वी ‘जीवनसाथी डॉटकॉम’ या मॅट्रोमोनियल अॅप वर ऑनलाईन नोंदणी केली होती. दरम्यान ८ ऑगस्टला त्यांना व्हॉटस्अॅपवर संतोष जोशी या नावाने संदेश आला.

दरम्यान त्याने रूनेनबर्ग नेदरलॅंड येथे राहत असून खासगी कंपनीत आर्किटेक्चर इंजिनियर असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी स्वतःचा ‘मॅट्रोमोनियल अॅप’ वरील बायोडाटासह फोटो पाठविला. याशिवाय निकीताला लग्न करण्याचे आमिष दिले. दरम्यान त्यातून त्याने विश्‍वास संपादन केला. त्यामुळे दोघेही एकमेकांसोबत व्हॉटस्अॅप चॅट व कॉलिंगव्दारे बोलू लागले. एक दिवस संतोष जोशी याने निकिताला नेदरलॅंडवरून काही पार्सल, गिफ्ट पाठवित असून त्यात दागिने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कपडे, बॅग व इन्व्हलपमध्ये ५० हजार युरो चलन पाठविले असल्याची माहिती दिली. ते सामान दिल्ली एअरपोर्ट अथॉरिटीकडून सोडविण्यासाठी कस्टम डयुटी भरावी लागणार असल्याचे सांगितले.

ते भरल्याशिवाय ते मिळणार नसल्याची बतावणी केली. दरम्यान निकीता सहारे यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून संतोष जोशी याच्या खात्यात २ लाख ५२ हजार ६०० रुपयांचे पेमेंट केले. मात्र, याबाबत विचारणा केली असता, असे कुठलेही पार्सल नसल्याची माहिती समोर आली. याशिवाय संतोषला संपर्क केला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यातून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षा येताच, त्यांनी सदर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करीत, त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

नोकरीचे आमिष दाखवून १० लाखांनी फसवणूक

नागपूर, रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दहा लाखांनी गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी धरेंद्रसिंग उधलसिंग गौर (वय ५७) रा.माळीपुरा याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रवींद्र अंतराम बावनकर रा.सीताबर्डी यांनी याबाबत तक्रार दिली होती. फेब्रुवारी २०१९मध्ये गौर याने रवींद्र यांच्या दोन मुलांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून दहा लाख १० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याने रवींद्र यांच्या मुलांना नोकरी लावून दिली नाही व पैसेही परत केले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com