Nagpur News: प्रेमविवाहाचा पश्‍चाताप होतोय म्हणत तरुणीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

Nagpur News: प्रेमविवाहाचा पश्‍चाताप होतोय म्हणत तरुणीची आत्महत्या

नागपूर : प्रेमविवाहाचा पश्‍चाताप झाल्याचे कारण देत २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही घटना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अध्यापकनगरात रविवारी (ता.२५) रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली.

तनुश्री अक्षय भोसले (वय २३) असे या विवाहितेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी तनुश्रीला आई-वडील नसून मोठा भाऊ आहे. ते काकांच्या घरी मोठे झालेत. अक्षय भोसले व तनुश्रीचे एकमेकांवर प्रेम जडले. दोघानींही घरच्यांचा विरोध पत्करत लग्न केले. चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला. लग्नानंतर तनुश्री आणि अक्षय दोघेही मानेवाडा परिसरातील अध्यापकनगरात भाड्याने राहात होते.(Nagpur News)

प्रेमविवाहाचा पश्‍चाताप होतोय म्हणत तरुणीची आत्महत्या

अक्षय खासगी नोकरी करतो. त्यातून तो कसाबसा घर चालवत होता. त्यामुळे निर्माण झालेल्या तणावातून तनुश्रीने रविवारी सायंकाळच्या सुमारास घरी सिलींग फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापूर्वी तनुश्रीने सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात प्रेमविवाह केल्याचा मला पश्‍चाताप होत असल्याने आत्महत्या करीत असल्याचे तिने नमूद केले. याप्रकरणी तिचा मोठा भाऊ प्रतीक किशोर बंसोड (वय २४, रा. कसबा, हिंगणा) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्‍वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.