नागपूर : सत्तांतराचा झेडपी राजकारणावरही परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur zilla parishad

नागपूर : सत्तांतराचा झेडपी राजकारणावरही परिणाम

नागपूर : मुंबईतील सत्तांतराचा परिणाम आता मिनी विधानसभा संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेतील राजकारणावरही होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी व कॉंग्रेस सत्तेच्या बाहेर गेल्याने जिल्ह्यातील मंत्र्यांची जे आता माजी झाले आहेत, शक्ती कमी होणार असून विरोधकांना बळ मिळणार आहे.

जिल्हा परिषदेत कॉंग्रेसची सत्ता आहे. यात राष्ट्रवादीसोबत शिवसेनाही सहभागी होती. परंतु शिवसेना सदस्य संजय झाडे यांनी अनेकदा कॉंग्रेस विरोधी भूमिका घेतली आहे. आता राज्यात सत्तांतर झाले असून ते जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसणार आहे. जिल्हा परिषदेत सुनील केदार यांच्या गटाचे वर्चस्व आहे. ते मंत्री होते. परिणामी त्याच्या गटाची चलती होती. परंतु आता राज्यात सत्तांतर झाले असून त्यांचे मंत्रिपद गेले. तर राज्यात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष असलेल्या भाजपला बळ मिळणार आहे. विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ येत्या १७ जुलैला पूर्ण होणार आहे. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षसह चार सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेत सत्ताधारी कॉंग्रेसमध्ये नाराजी आहे. काही सदस्यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त करीत अध्यक्षपदासाठी दावा केला आहे.

कॉंग्रेसमधील गट सक्रिय

कॉंग्रेसमध्ये असलेले दुसरे गटही पदासाठी सक्रिय झाले आहे. त्यांच्यात खलबते सुरू झाली आहेत. त्यांच्याकडून राज्यातील राजकारणाप्रमाणे तडजोड होण्याची चर्चा आहे. भाजपकडूनही त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nagpur Zilla Parishad Election Ncp Congress Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..