Nagpur ZP : घोटाळे, स्थगितीचा मुद्दा गाजणार

जि.प.ची सर्वसाधारण सभा ठरणार वादळी
Nagpur zilla parishad
Nagpur zilla parishad

नागपूर : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अनेक महिन्यानंतर होत आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी घोटाळे व स्थगितीचा मुद्दा समोर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती निवडीत अनेक जण नाराज आहेत. काहींनी बंडखोरी केली होती. त्यामुळे नाराज व बंडखोर सदस्य पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढविणार असल्याचेही चित्र आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा दर तीन महिन्यानंतर आयोजित केली जाते. परंतु, आता पाच,सहा महिन्यांनंतर मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेत सर्वसाधारण सभा होत आहे. शिवाय राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर विद्यमान सरकारने सर्व कामांना स्थगिती दिली होती. स्थगिती जरी उठली असली तरी सत्ताधाऱ्‍यांकडून विरोधकांना डिवचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच नुकत्याच नव्या पदाधिकाऱ्‍यांच्या निवडीत अनेक इच्छुक वरिष्ठांना डावलण्यात आले.

त्यामुळे त्यांच्यात खदखद आहे. शिवाय आधीच सत्ताधारी गटाचे चार बंडखोर सदस्य भाजपला मिळाल्याने त्यांची शक्ती वाढली आहे. पशुधन वाटपाची चौकशी सुरू आहे. तर सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणातील कंत्राटदाराचे देयके वितरित करण्याचा प्रताप विभागाने केला आहे. त्याबाबत शासनाला कळविण्याचे औदार्य विभागाने दाखविले नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक राहणार आहेत. दलित निधी वाटपात झालेल्या भेदभावामुळे विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही नाराज आहेत.

अध्यक्षा मुक्ता कोकड्डे एककल्ली कारभार करीत आहेत. त्यांच्याबाबत अनेक तक्रारी येत असून त्यांच्या कामाने सदस्य समाधानी नाहीत. सर्व विषयांबाबत प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत.

-आतिश उमरे विरोधी पक्षनेते, जि.प.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com